जपानमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामी येण्याचा धोका असल्याचाही दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 06:27 AM2022-03-17T06:27:40+5:302022-03-17T06:27:46+5:30

जपानच्या हवामान खात्याने सांगितले की, समुद्रात ६० किमी खोल हा भूकंपाचा धक्का बसला आहे.

7.3 magnitude earthquake shakes Japan | जपानमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामी येण्याचा धोका असल्याचाही दिला इशारा

जपानमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामी येण्याचा धोका असल्याचाही दिला इशारा

googlenewsNext

टोकियो : जपानमध्ये फुकुशिमा किनारपट्टीच्या भागात ७.३ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्यामुळे या परिसरातील २० लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.  तसेच या भागात त्सुनामी येण्याचा धोका असल्याचा इशाराही देण्यात आला.

जपानच्या हवामान खात्याने सांगितले की, समुद्रात ६० किमी खोल हा भूकंपाचा धक्का बसला आहे. याच भागात मार्च २०११मध्ये ९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता व त्यानंतर त्सुनामीची लाट आली होती. त्यावेळी फुकुशिमा दाईची अणुप्रकल्पातील शीतकरण प्रक्रिया बंद पडली होती. बुधवारी झालेल्या भूकंपानंतर मियागी व फुकुशिमा भागात समुद्रात एक मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामीच्या लाटा उसळतील अशी शक्यता आहे. या भूकंपाने टोकियोसह अनेक भागांतील इमारतींना हादरे बसले. मात्र कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: 7.3 magnitude earthquake shakes Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.