ब्रिटन, अमेरिकेसह 74 देशांमध्ये सायबर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2017 06:50 AM2017-05-13T06:50:11+5:302017-05-13T09:06:32+5:30

इंग्लंडमधील रूग्णालयांवर मोठा सायबर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. "नॅशनल हेल्थ सर्विस"शी (एनएचएस) संबंधित संगणकांवर हा हल्ला करण्यात आला असून संगणक हॅक करण्यात आले आहेत.

74 countries including Britain, US, cyber attack | ब्रिटन, अमेरिकेसह 74 देशांमध्ये सायबर हल्ला

ब्रिटन, अमेरिकेसह 74 देशांमध्ये सायबर हल्ला

Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन/मद्रिद, दि. 13 - इंग्लंडमधील रूग्णालयांवर मोठा सायबर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. "नॅशनल हेल्थ सर्विस"शी (एनएचएस) संबंधित संगणकांवर हा हल्ला करण्यात आला असून संगणक हॅक करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील संपूर्ण आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे.या सायबर हल्ल्याची झळ जवळपास 74 देशांना बसल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली.  स्पेनच्या अनेक कंपन्यातील सॉफ्टवेअरही सायबर हल्ल्यामुळे बाधित झाले आहे. तसेच स्पेनमधील दूरसंचार कंपनी "टेलीफोनिका"च्या सेवादेखील सायबर हल्ल्याने विस्कळीत झाल्या आहेत.
 
"रेन्समवेअर"द्वारे हा सायबर हल्ला करण्यात आल्याचं वृत्त आहे. "रेन्समवेअर"द्वारे हॅक केल्यास हॅकरच्या तावडीतून सोडवणं कठीण असतं आणि शक्यतो त्यासाठी पैशांची तोडजोड केली जाते. वेबसाइटवर हॅकर्सनी फेसबुक पेजची माहिती दिलेली असते तेथे पैशांबाबत तडजोड केली जाते.   
 
सायबर हल्ल्यामुळे इंग्लंडच्या काही प्रांतांमधील इस्पितळे बंद केली असून, अत्यंत निकडीच्या स्थितीतच वैद्यकीय सेवा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘वॉनाक्राय रेन्समवेअर’ या मॅलवेअरमुळे हा बिघाड झाला असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: 74 countries including Britain, US, cyber attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.