७५० निर्वासितांची लिबियाजवळ सुटका

By admin | Published: September 19, 2015 10:02 PM2015-09-19T22:02:43+5:302015-09-19T22:02:43+5:30

युद्धाच्या छायेखाली असलेल्या व सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सागरी मार्गे पलायन करणाऱ्या ७५० लोकांना समुद्रात बुडताना लिबियाच्या तटरक्षक दलाने वाचविले. हे ७५० जण तीन नौकांवरून जात होते.

750 refugees rescued near Libya | ७५० निर्वासितांची लिबियाजवळ सुटका

७५० निर्वासितांची लिबियाजवळ सुटका

Next

बैरूत : युद्धाच्या छायेखाली असलेल्या व सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सागरी मार्गे पलायन करणाऱ्या ७५० लोकांना समुद्रात बुडताना लिबियाच्या तटरक्षक दलाने वाचविले. हे ७५० जण तीन नौकांवरून जात होते.
लिबियापासून जवळच आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत ही घटना शनिवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे बचाव करणाऱ्या पथकात कोणत्याही सागरी सरहद्दीचे बंधन नसणाऱ्या डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
बैरूतमधील विभागीय दूरसंचार अधिकारी याझन अली सादी म्हणाले की, स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजता तीन नौकांतून जाताना हे लोक आढळले. त्यातील काही जण नौकेत लटकत होते, तर लहान मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. हे निर्वासित असल्याचे लक्षात येताच लिबियाच्या तटरक्षक दलाने तिकडे धाव घेतली आणि या सर्वांना वाचविले. ते जवळपास ७५० जण होते.
या भागातच निर्वासित घेऊन जाणारी चौथी नौका असल्याचा संशय असून, तिचा शोध सुरू आहे. या नौकेवरील परिस्थिती काय आहे, हे समजू शकले नाही. भूमध्यसागरातच लिबियन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी १०२ निर्वासितांना वाचविले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: 750 refugees rescued near Libya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.