पाकमधील क्वेटा शहरात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला, ८ ठार
By Admin | Published: February 6, 2016 07:51 PM2016-02-06T19:51:10+5:302016-02-06T20:10:07+5:30
पाकिस्तानच्या पश्चिमेकडील क्वेटा शहरात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती बॉम्ब हल्लात आठ जवानांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले आहेत.
>ऑनलाइन लोकमत
क्वेटा, दि. ६ - पाकिस्तानच्या पश्चिमेकडील क्वेटा शहरात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती बॉम्ब हल्लात आठ जवानांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले आहेत.
प्रांतीय गृहसचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या निमलष्करी दलातील एक भाग असलेल्या फ्रंटियर कॉर्प्सच्या जवानांच्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठ जवानांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. जखमींना येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, मृत झालेल्या चार जवानांची ओळख पटली असून बाकीच्या चार जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. या हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, या हल्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असल्याचे समजते.