८ वर्षांची रशियन मुलगी जगप्रसिद्ध सुपर मॉडेल

By admin | Published: December 26, 2014 01:32 AM2014-12-26T01:32:47+5:302014-12-26T01:32:47+5:30

रशियातील ८ वर्षांची क्रिस्तिना पिमेनोवा ही मुलगी जगातील सर्वांत सुंदर मुलगी ठरली आहे;

8 year old Russian girl world famous super model | ८ वर्षांची रशियन मुलगी जगप्रसिद्ध सुपर मॉडेल

८ वर्षांची रशियन मुलगी जगप्रसिद्ध सुपर मॉडेल

Next

मॉस्को : रशियातील ८ वर्षांची क्रिस्तिना पिमेनोवा ही मुलगी जगातील सर्वांत सुंदर मुलगी ठरली आहे; पण या छोट्या मुलीला मिळणा-या प्रसिद्धीची माहिती नाही, असे तिच्या आईचे म्हणणे आहे.
क्रिस्तिना वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कॅटवॉक करते. अरमानी व रॉबर्टो कावली या जगप्रसिद्ध कंपन्यांची ती मॉडेल आहे. तिचे मोठेमोठे निळे डोळे आणि चिमुकल्या चेहऱ्यावरचे सुमधुर हास्य चाहत्यांना भुरळ घालत आहे. २७ डिसेंबर २००५ रोजी जन्मलेल्या क्रिस्तिनाचे सध्या प्रसिद्ध होणारे फोटो वाईट आहेत असे कोणीच म्हणणार नाही; पण सामाजिक वेबसाईटवर ते टाकले गेल्यानंतर या प्रकाराला कधीही घातक वळण येऊ शकते असा इशारा अमेरिकन अभिनेत्री व मॉडेल ब्रुक शील्डने दिला आहे. (वृत्तसंस्था)


 

 

Web Title: 8 year old Russian girl world famous super model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.