मानवी शिर ८० हजाराला; अन्य अवयव ५० लाखांत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 06:42 AM2023-06-20T06:42:09+5:302023-06-20T06:42:26+5:30
सेड्रिक हा काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेहांचे शिर, हाडे, मांस, आदी अवयव काढून ते काळ्या बाजारात महागड्या किमतीत विकत होता.
मेसाच्युसेट : अमेरिकेतील प्रख्यात हार्वर्ड विद्यापीठातीच्या शवागारातील मृतदेहांच्या अवयवांची तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. हे दुष्कृत्य करणाऱ्या सेड्रिक लॉज आणि डेनिश या पती-पत्नीला अटक करण्यात आली. यापैकी सेड्रिक हा या शवागाराचा व्यवस्थापक आहे.
सेड्रिक हा काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेहांचे शिर, हाडे, मांस, आदी अवयव काढून ते काळ्या बाजारात महागड्या किमतीत विकत होता. पोलिस तपासात सेड्रिकने मानवी शिर ८० हजार रुपयांला विकल्याचे उघड झाले. आतापर्यंत त्याने सात शिरांची विक्री केली. तसेच एका ग्राहकासोबत त्याचा अवयवविक्रीसंदर्भात ५० लाख रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचे समोर आले.