आइसलँडमध्ये १४ तासांत भूकंपाचे ८०० झटके, सरकारनं जाहीर केली आणीबाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 06:30 PM2023-11-11T18:30:17+5:302023-11-11T18:30:28+5:30
आइसलँडच्या एका प्रांतात १४ तासात तब्बल भूकंपाच्या ८०० झटक्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
आइसलँडच्या एका प्रांतात १४ तासात तब्बल भूकंपाच्या ८०० झटक्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यानंतर सरकारनं येथे आणीबाणी जाहीर केली. जगभरात सातत्यानं भूकंपाचे झटके जगभरात जाणवत असतात. उत्तर भारतातही भूकंपाचे झटके सातत्यानं जाणवत आहेत. पण आइसलँडमध्ये भूकंपाच्या झटक्यांनी विक्रम केला आहे. आइसलँड हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.
भूकंपामुळे १६ नोव्हेंबरपर्यंत पर्यटन बंद ठेवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या १४ तासांत रेकजेन्स प्रदेशात ८०० हून अधिक भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर ४ च्या आसपास होती. या भूकंपांमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.
काय आहे कारण?
आइसलँडमध्ये ज्वालामुखीच्या क्रिया वारंवार घडतात. येथे अनेक भागात लावा आणि कोन्स आहेत. आइसलँडचा रेकजेन्स भाग अटलांटिक समुद्राजवळ आहे. या भागात नेहमी ज्वालामुखीचा धोका असतो. येथे अनेक दऱ्या आहेत ज्यांना मोठ्या भेगा आहेत. आइसलँडच्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार भूकंपानंतर किती दिवसांनी ज्वालामुखीचा उद्रेक होईल हे सांगता येत नाही, पण ते शक्य आहे. दरम्यान, यावेळी तब्बल ४ हजार घरांना भूकंपाचे झटके जाणवले.