८०० ओलिसांची नायजेरियात सुटका
By admin | Published: March 26, 2016 12:48 AM2016-03-26T00:48:18+5:302016-03-26T00:48:18+5:30
नायजेरियन लष्कराने देशाच्या हिंसाचारग्रस्त ईशान्य भागात धडाकेबाज कारवाई करत इस्लामी दहशतवादी बोको हरामने ओलीस ठेवलेल्या ८०० हून अधिक लोकांची सुटका केली.
Next
कानो : नायजेरियन लष्कराने देशाच्या हिंसाचारग्रस्त ईशान्य भागात धडाकेबाज कारवाई करत इस्लामी दहशतवादी बोको हरामने ओलीस ठेवलेल्या ८०० हून अधिक लोकांची सुटका केली.
या सर्वांना बोर्नो राज्यातील विविध गावांत ओलीस ठेवण्यात आले होते. लष्कराने बोको हरामच्या दहशतवाद्यांशी लढाई करत कुसुम्मा गावातून ५२० ओलिसांची सुटका केली, तर अन्य ११ गावांतून आणखी ३०९ ओलिसांना मुक्त केले. या मोहिमेदरम्यान २२ दहशतवादी
मारले गेले.