Corona : स्‍पेनमध्ये 24 तासांत 812 जणांचा मृत्यू, "दोन आठवड्यात सर्वाधिक होऊ शकतो अमेरिकेचा मृत्यूदर"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 06:57 PM2020-03-30T18:57:18+5:302020-03-30T19:11:19+5:30

आम्ही अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. यामुळेच संक्रमित लोकांची संख्या 100,000 ते 200,000पर्यंत रोखली गेली. याच बरोबर, अमेरिकेत पुढील दोन आठवड्यांत कोरोना व्हायरसमुळे मरणारांची संख्या सर्वाधिक होऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

812 deaths from coronavirus in spain in 24 hours sna | Corona : स्‍पेनमध्ये 24 तासांत 812 जणांचा मृत्यू, "दोन आठवड्यात सर्वाधिक होऊ शकतो अमेरिकेचा मृत्यूदर"

Corona : स्‍पेनमध्ये 24 तासांत 812 जणांचा मृत्यू, "दोन आठवड्यात सर्वाधिक होऊ शकतो अमेरिकेचा मृत्यूदर"

Next
ठळक मुद्देइटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे गेल्या 24 तासांत 756 जणांचा मृत्यू  ट्रम्प म्हणाले पुढील दोन आठवडे आव्हानात्मक चीनने मदत म्हणून युरोपीय देशांना पाठवलेले वैद्यकीय साहित्य निकृष्ट दर्जाचे

माद्रिद/वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला मगरमिठी मारली आहे. याचा सामना करताना बडे-बडे देशही हतबल होत आहेत. स्‍पेनमध्ये गेल्या 24 तासांत 812 जणांचा मृत्यू झाला. येथील मृतांचा आकडा आता 7,340वर पोहोचला आहे. यातच, अमेरिकेत पुढील दोन दिवसांत मृत्यू दर सर्वाधिक होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. 
 
जगभरातील कोरोना बाधितांची संख्या आता तब्बल 720,000वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 33,969 जणांचा त्याने बळी घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत तब्बल 143,025 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर 2,509 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे गेल्या 24 तासांत 756 जणांचा मृत्यू झाला. येथील मृतांचा आकडा आता 10,779वर जाऊन पोहोचला आहे.

पुढील दोन आठवडे आव्हानात्मक - ट्रम्प  
अमेरिकेतील काही तज्ज्ञांनी कोरोनामुळे तब्बल एक ते दो लाख लोकांचा मृत्यू होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सोशल डिस्टंसिंग शिवाय मृत्यू दर 2.2 मिलियनपर्यंत पोहोचू शकत होता. यामुळे सिद्ध झाले आहे, की आम्ही अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. यामुळेच संक्रमित लोकांची संख्या 100,000 ते 200,000 पर्यंत रोखली गेली, असे म्हटले आहे. मात्र याच बरोबर त्यांनी, अमेरिकेत पुढील दोन आठवड्यांत कोरोना व्हायरसमुळे मरणारांची संख्या सर्वाधिक होऊ शकते, असेही म्हटले आहे. यामुळेच त्यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घातलेले नियम 30 एप्रिलपर्यंत वाढवले आहेत.

मॉस्‍को बंद -
इटलीनंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका स्पेनला बसला आहे. रविवारीदेखील येथे एकाच दिवसात 838 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर रशियाने राजधानी मॉस्कोमध्ये सोमवारी बंदची घोषणा केली. मात्र, आवश्यक सेवा पुरवणाऱ्यांना बाहेर निघण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे 1,534 जणांना  कोरोनाची लागण झाली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनने मदत म्हणून पाठवलेली कोरोना टेस्टिंग किट निकृष्ट -
चीनमधून उगम पावलेला कोरोना विषाणू सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, कोरोनामधून सावरल्यानंतर चीनने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या इतर देशांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र चीनचे हे औदार्य भेसळयुक्त असल्याचे समोर येऊ लागले आहे. कोरोनामुळे आरोग्यसेवेचे कंबरडे मोडलेल्या युरोपमधील अनेक देशांना चीनने पाठवलेले टेस्टिंग किट्स निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनच्या मदतीमागील हेतुबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. 

चीनने पाठवलेले टेस्टिंग किट हे सदोष असल्याचे समोर आल्यानंतर स्पेन आणि झेक प्रजासत्ताक या देशांनी चिनी टेस्टिंग किटचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
 

Web Title: 812 deaths from coronavirus in spain in 24 hours sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.