अमेरिकेच्या अलास्का बेटाला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 05:12 PM2018-01-23T17:12:43+5:302018-01-23T17:17:15+5:30
अमेरिकेच्या अलास्का बेटाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे(USGS) अंदाजानुसार, भूकंपाची तीव्रता 8.2 रिश्टर स्केल इतकी होती. तसेच भूकंपाच्या धक्क्यानंतर अमेरिकेला त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या अलास्का बेटाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे(USGS) अंदाजानुसार, भूकंपाची तीव्रता 8.2 रिश्टर स्केल इतकी होती. तसेच भूकंपाच्या धक्क्यानंतर अमेरिकेला त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.
अलास्का आणि इतर भागांना त्सुनामीचा अलर्ट दिला असून, सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच अमेरिकेच्या पश्चिमी किना-यांवर येणा-या त्सुनामीवर आपत्कालीन विभागाला नजर ठेवण्यास सांगितलं आहे. अलास्कामधल्या चिनिएक शहराच्या दक्षिणपूर्व भागातील 256 किमी दूर भूकंपाचे झटके बसले आहेत. USGSच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता हा भूकंपाचा धक्का बसला आहे.
#BREAKING 8.2 magnitude quake hits off Alaska: USGS
— AFP news agency (@AFP) January 23, 2018
भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किलोमीटर खोलवर दाखवण्यात आला आहे. आपत्कालीन विभागानं अलास्का आणि ब्रिटिश कोलंबियाला अलर्ट जारी केला आहे. जर तुम्ही किनारी भागात राहत असाल, तर लवकरात लवकर त्या भागापासून दूर निघून जावा. कारण समुद्रातून मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे, असंही अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे.