२, ३ आणि ४ जूनला महाराष्ट्र मंडळ लंडनचा ८५वा वर्धापन सोहळा
By admin | Published: May 28, 2017 12:39 PM2017-05-28T12:39:08+5:302017-05-28T12:39:08+5:30
लंडन मराठी संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र मंडळ लंडनचा ८५वा वर्धापन सोहळा अगदी आनंदात आणि जल्लोषात २, ३ आणि ४ जूनला साजरा होणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 28 - लंडन मराठी संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र मंडळ लंडनचा ८५वा वर्धापन सोहळा अगदी आनंदात आणि जल्लोषात २, ३ आणि ४ जूनला साजरा होणार आहे. तो महाराष्ट्रीय उद्योजकतेचा, संस्कृतीचा आणि चैतन्याचा एक मोठा उत्सव असणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील कोमोडोर डेविड एलफोर्ड जे प्रादेशिक सैन्याचे कमांडर आणि पूर्व इंग्लंडच्या नौदलाचे प्रादेशिक कमांडर आहेत. त्यांनी लंडन मराठी संमेलनाचे मुख्य अतिथी होण्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि शिवाजी महाराजांनी आरमाराच्या महत्वाबद्दल दाखवलेली दूरदृष्टीचा देखील त्यांनी उल्लेख केला आहे.
मुख्य प्रायोजक भारत विकास ग्रुप (BVG) चे श्री HR गायकवाड यांचे लंडन मराठी संमेलन आणि महाराष्ट्र मंडळ लंडन हे अत्यंत आभारी आहेत. त्यांची मदत लाभली नसती तर हे संमेलन होणं अवघड झालं असत. त्यामुळे सर्व लंडनकरांतर्फे त्यांचे पुनश्च आभार आणि आशा करतो की त्यांची एकीकृत सेवा देणारी संस्था भारतातच नव्हे तर सर्व जगामध्ये वेगाने पसरो. आम्ही आमचे इतर प्रयोजकांचे देखील आभारी आहोत: ट्रॅव्हल पार्टनर - मँगो हॉलीडेस, केटरिंग पार्टनर - रोशनीस फाईन इंडियन डायनिंग, लॉजिस्टिकस पार्टनर - युनिक एयर एक्सप्रेस आणि आमचे रेडिओ पार्टनर - nusound रेडिओ.
UK मध्ये अस्थिमज्जा दाता नोंदणीपुस्तक असतं ज्याच्यामध्ये अस्थिमज्जा दान करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची माहिती असते. अस्थिमज्जा देणारा आणि घेणारा हे जेवढे पारंपरिक/वांशिक प्रकारे जोडले असतात तेवढ्याच प्रमाणात त्याची स्वीकृती होण्याचे प्रमाण जास्त असते. आशियाई दात्यांची नोंदणी ही यूरोपीय देणगीदारांपेक्षा फारच कमी आहे ज्याचा अर्थ जर का एखाद्या भारतीय माणसाचा जीव अस्थिमज्जा प्रत्यारोपणाने वाचू शकत असेल तर अस्थिमज्जा दाता नसल्याकारणाने तो वाचू शकणार नाही. LMS च्या निमित्ताने "रिया दांडेकर अस्थिमज्जा प्रकल्प" हाती घेतला आहे ज्याच्यामध्ये पात्र असलेल्या उपस्थित लोकांची नोंदणी करण्यात येणार आहे. काही वर्षांपूरवी बर्मिंगहॅम मध्ये रिया दांडेकर ह्या तरुण महिलेचा योग्यतो दाता न मिळाल्यामुळे मृत्यू झाला होता. LMS च्या निमित्ताने आम्ही आशा करतो की अशी वेळ पुढे चालून कुणावर न येवो
LMS मध्ये भारतातून येणाऱ्या आणि स्थानिक कलाकारांचा योग्य तो समन्वय असणार आहे जेणेकरून सर्व उपास्तीथांना एक सुंदर आणि अविस्मरणीय असा अनुभव मिळणार आहे. याच सदरात स्थानिक कलाकार एक प्रभावी असा रॅम्प वॉल्क / फॅशन शो करणार आहेत. ह्या LMS मध्ये मिस टीन कॉन्टिनेन्टस UK, अंजली सिन्हा येणार आहे. तिने मिस टीन कॉन्टिनेन्टस पेजेंट २०१६ ही स्पर्धा जिंकली आहे. अंजली ची आई अश्विनी वेल्वळ ही मराठी आहे.
LMS ला खालील व्यक्तींचा त्यांनी केलेल्या अभूतपूर्व समाजसेवेबद्दल, आणि आपआपल्या क्षेत्रात दैदिप्यमान कर्तृत्त्व दाखवल्या बद्दल सन्मान करतांना अत्यंत आनंद होत आहे:
रांका ज्वेलर्स चे श्री फतेहचंद रांका यांना "एक्सलेन्स अचिव्हमेंट इन बिझनेस आणि सोशल पुरस्कार"
PNG ज्वेलर्स चे श्री सौरभ गाडगीळ यांना "महाराष्ट्रीयन यूथ आंतरप्रेन्युर आयकॉन पुरस्कार"
बडवे इंजिनीरिंग लिमिटेड चे श्री श्रीकांत बडवे यांना "ऑटोमोटिव्ह इंजिनीरिंग एक्सलेन्स LMS पुरस्कार " आणि
R.K"s होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सी चे श्री राजेश खानविलकर यांना "रियल इस्टेट जगतातील स्पेशल इनोवेटिव्ह पुरस्कार"
LMS ची सर्व कोर समिती आणि शिलेदार (स्वयंसेवक) हे सर्व जगभरातून येणाऱ्या कलाकारांचे, प्रतिनिधींचे, उद्योजकांचे, पाहुण्यांचे आणि प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करायला उत्सुक आहेत.
LMS च्या इत्यंभूत माहिती साठी भेट द्या www.lms2017.org.uk