कॉलेजला न जाता 9 जण झाले कोट्यधीश
By admin | Published: May 6, 2016 08:19 PM2016-05-06T20:19:11+5:302016-05-06T20:19:11+5:30
कमी शिक्षण घेऊनही त्यांनी कोट्यधीश होण्याचा मान मिळवला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अमेरिका, दि. 6- शिक्षणाशिवाय आयुष्यात प्रगती करणं अनेकदा अशक्यप्राय होतं. उच्च विद्याविभूषित व्यक्तींनाच ब-याचदा मोठमोठ्या पदांवर आणि हुद्यांवर नोक-या मिळतात. मात्र अमेरिकेतले 9 जण चक्क याला अपवाद ठरले आहेत. कमी शिक्षण घेऊनही त्यांनी कोट्यधीश होण्याचा मान मिळवला आहे. शिक्षणाशिवायही आयुष्यात उंच भरारी घेता येते हे या 9 जणांनी कोट्यधीश होऊन जगाला दाखवून दिलं आहे.
कोट्यधीश झालेल्यांची नावं-
1. पॉल अॅलेन या व्यक्तीनं वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतून शालेय शिक्षण घेतलं असून, तो सध्या बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत सह भागीदार आहे. त्याच्याजवळ 1630 कोटींची मालमत्ता आहे.
2. लॅरी इलिसननं शिकागो युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. तो सध्या ओरॅकल कंपनीत सीईओ आणि सहभागीदार आहे. त्याची जवळपास 5100 कोटींची मालमत्ता आहे.
3. सीन पारकेर यांनी चांटिली शाळेतून शालेय शिक्षण घेतलं आहे. प्लाक्सो, नेपस्टर, एअरटाइम या कंपनी मोठ्या हुद्द्यावर आहेत. नेपस्टर या म्युझिक शेअर कंपनीत सहभागीदार आहेत. त्यांच्याकडे 320 कोटींची मालमत्ता आहेत.
4. एव्हन विलियम हा एकमेव टि्वटरचा को फाऊंडर आहे. त्यांनी नेबरास्का युनिव्हर्सिटीतून शालेय शिक्षण घेतलं आहे. त्यांच्याकडे जवळपास 320 कोटींची संपत्ती आहे
5. जॅन कोम हे व्हॉट्सअपचे निर्माता आहेत. सन जोस युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. ते 760 कोटींचे मालक आहेत. 2014ला त्यांनी फेसबुकवर मोबाईलचे मॅसेज येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
6. डस्टिन मॉस्कोव्हिट्झ यांनी हार्वर्ड या युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. त्यांची फेसबुकचे निर्माता झुकेरबर्ग यांच्या गाठभेट झाली. त्यानंतर त्यांनी जगात मोठ्या सोशल नेटवर्किंगचं जाळं उभारलं. सध्यात त्यांच्याकडे 810 कोटींची मालमत्ता आहे.
7. हिरोशी यमाउची हे निन्टेंडो या कंपनीत तिसरे प्रमुख राहिले आहेत. त्यांनी वासेडा युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं. त्यांच्याकडे सध्या 210 कोटींची संपत्ती आहे.
8. गेब नेवेल हे व्हॅल्यू या कंपनीचे सह संस्थापक आहेत. त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. साय-फाय गेम बनवणा-या कंपनीत ते अनेक वर्षं कार्यरत होते. त्यांच्याकडे सध्या 130 कोटींची मालमत्ता आहे.
9. अझीम प्रेमजी हे स्टॅनफोर्ड या शाळेतून ड्रापआऊट आहेत. ते सध्या विप्रो या कंपनीत चेअरमन पदावर कार्यरत आहेत. त्यांची 1670 कोटींची मालमत्ता आहे.