इराण-पाकिस्तानची ९०० किमी हायटेन्शन सीमा; दोन्ही देशाचे सैन्य समोरासमोर ठाकले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:36 PM2024-01-19T13:36:31+5:302024-01-19T13:37:53+5:30
या भागासाठी इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात कायम संघर्ष असतो. १८ व्या शतकात ब्रिटीश सरकारने भारताच्या बहुतांश भागावर कब्जा केला होता
९०९ किमी लांबीच्या सीमेवर इराण आणि पाकिस्तानचं सैन्य समोरासमोर आले आहे. सैनिक आणि शस्त्रात्रे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात जमा झालेत. एकीकडे इराणचा सिस्तान प्रांत आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचा बलूचिस्तान प्रांत या सीमेला लागून आहे. ही जागा कुह ए मलिक सालीह डोंगराळ भाग आहे. या भागाच्या दक्षिण पश्चिमेस तहलब नदी आणि पूर्वेकडे मश्किल नदी आहे. दक्षिणेच्या दिशेला नहंग नदी असून डोंगराच्या पलीकडे तुम्ही ग्वादर खाडी आणि अमन खाडीपर्यंत जाऊ शकता.
या भागासाठी इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात कायम संघर्ष असतो. १८ व्या शतकात ब्रिटीश सरकारने भारताच्या बहुतांश भागावर कब्जा केला होता. पाकिस्तान तेव्हा भारताचा भाग होता. तेव्हा १८७१ मध्ये ब्रिटीश सरकार आणि इराण यांच्यात सीमा करार होऊन दोन्ही देशांची सीमा निश्चित केली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान वेगळा झाला. पाकिस्तानने इराणसोबत १९५८-५९ मध्ये सीमा आखून घेतली. त्या मैदानात पिलर्स उभे केले. जून २०२३ मध्ये या सीमेजवळ एक दहशतवादी हल्ला झाला. त्यात पाकिस्तानी सीमेवर तैनात काही सैनिक मारले गेले. त्यानंतर काही दिवसांत याच सीमेवर इराणच्या बाजूस दहशतवादी हल्ला झाला. त्यात ५ इराणी सैनिक मारले गेले.
इराणनं २०११ मध्ये त्यांच्या सीमेवर फेसिंगचे काम सुरू केले होते. ज्यात ३ फूट मोठी आणि १० फूट उंची सिमेंटची भिंत बांधून घेतली. ज्याच्या चहुबाजूने स्टील रॉड्स लावले. ही भिंत ताफ्तानपासून मांडपर्यंत ७०० किमीपर्यंत बनवली. पाकिस्तानने २०१९ मध्ये फेसिंग सुरू केली. जानेवारी २०२२ पर्यंत पाकिस्तानने त्यांच्या सीमेच्या ९० टक्क्यापर्यंत फेसिंगने सुरक्षित केले. पाकिस्तानहून इराणला ४ रस्ते जातात. हे चारही रस्ते सुरु आहेत. ताफ्तान ते मिरजावेह, ग्वादर ते चाबहार, मांड ते पिशिन आणि चादगी ते कुहक असे चार रस्ते आहेत. हे सर्व रस्ते बलूचिस्तानच्या सिस्तानच्या दिशेने जातात. दरम्यान, ९०९ किमी लांब या सीमेच्या दोन्ही बाजूने रहिवाशी वस्त्या आहेत. इराणच्या बाजूस १४ गाव आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानच्या बलूचिस्तान इथं ११ गाव आहेत.