श्रीलंकेत पावसाचे 91 बळी

By admin | Published: May 27, 2017 07:15 AM2017-05-27T07:15:31+5:302017-05-27T07:15:31+5:30

मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर व भूस्खलनाने श्रीलंकेत 91 जणांचा बळी घेतला आहे. देशातील 20 हजार नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे.

91 wickets in Sri Lanka | श्रीलंकेत पावसाचे 91 बळी

श्रीलंकेत पावसाचे 91 बळी

Next

ऑऩलाइन लोकमत
कोलंबो, दि. 27  : मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर व भूस्खलनाने श्रीलंकेत 91 जणांचा बळी घेतला आहे. देशातील 20 हजार नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे.
देशाच्या अनेक भागांत गुरुवारपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे उपमंत्री दुनेश गानकानडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 91 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 110 पेक्षा जास्त जण बेपत्ता नोंदविले आहेत. गुरुवार व शुक्रवार मिळून देशात 300 ते 500 मिमी पाऊस झाला. काही भागात तर 600 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
श्रीलंकेचे हवाई दल आणि नौदलाचे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टर आणि बोटींच्या माध्यमातून मदत करीत आहेत. सन 2003 ला पावसाने व भूस्खलनाने देशातील दक्षिण भागात 250 नागरिकांचा बळी घेतला होता.

Web Title: 91 wickets in Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.