कासवाच्या पोटातून निघाली 915 नाणी

By admin | Published: March 8, 2017 05:16 PM2017-03-08T17:16:19+5:302017-03-08T18:45:58+5:30

श्रद्धेतून थायलंडमधील एका कासवाच्या पोटातून 915 नाणी काढण्यात आली आहेत.

915 coins out of a turtle | कासवाच्या पोटातून निघाली 915 नाणी

कासवाच्या पोटातून निघाली 915 नाणी

Next

ऑनलाइन लोकमत
थायलंड, दि. 8 - कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहे. श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव सत्त्वगुणप्रधान स्वरुपात असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्‍त होत असते, अशीही आख्यायिका सांगितली जाते. त्याप्रमाणेच कारंज्यात नाणी टाकण्यावर अनेकांची श्रद्धा असते. असं म्हणतात, कारंज्यात नाणी टाकल्यानं घरात सदासर्वकाळ लक्ष्मी निवास करते. याच श्रद्धेतून थायलंडमधील एका कासवाच्या पाणवठ्यात भक्तांनी टाकलेली नाणी कासवानं गिळली आहेत. 

डॉक्टरांनी त्या कासवावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्या पोटातून  915 नाणी बाहेर काढली आहेत. बँगकॉकमधील पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांनी या मादी कासवावर शस्त्रक्रिया केली. तिचे नाव बँक असून, ती 25 वर्षांची आहे. थायलंडच्या पूर्वेकडील श्री राचा या शहरातील एका प्राणिसंग्रहालयात ही मादी कासव होती. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांनी तिच्या पाणवठ्यात टाकलेली नाणी ती गिळत असे. त्यामुळे सगळी नाणी तिच्या पोटात जमा झाली होती.

कासवाच्या कुंडात नाणी टाकल्याने नशीब उजळते, अशी थायलंडच्या नागरिकांची श्रद्धा आहे.त्यामुळेच बँकच्या पोटात या नाण्यांचा गोळा झाला होता. या मादी कासवाचे वजन 5 किलो एवढे होते. त्यामुळे तिच्या घशातील अस्तराला चीर पडली होती. त्यामुळे तिचा जीव जाण्याचीही शक्यता होती. चुलालोंगकॉम युनिव्हर्सिटीच्या पशुवैद्यकांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळी डॉक्टरांनी 10 सेमीची चीर करून काही नाणी काढली, मात्र सगळी नाणी काढणे शक्य नसल्यामुळे एक-एक करून ती काढावी लागली. त्यातील अनेक नाणी गंजलेल्या अवस्थेत होती. नाण्यांशिवाय तिच्या पोटातून डॉक्टरांनी माशांचे दोन गळही काढले आहेत.

Web Title: 915 coins out of a turtle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.