९२ वर्षे वय, ६६ वर्षांची प्रेयसी! प्रसारमाध्यमांचे बादशाह रूपर्ट मर्डोक पाचव्यांदा लग्न करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 10:31 AM2023-03-21T10:31:45+5:302023-03-21T10:32:11+5:30

मर्डोक चौथ्या पत्नीपासून गेल्या वर्षीच विभक्त झाले होते. आधीच्या पत्नींपासून त्यांना सहा मुले आहेत.

92 years old media king, 66 years old girlfriend! Media mogul Rupert Murdoch will marry for the fifth time | ९२ वर्षे वय, ६६ वर्षांची प्रेयसी! प्रसारमाध्यमांचे बादशाह रूपर्ट मर्डोक पाचव्यांदा लग्न करणार

९२ वर्षे वय, ६६ वर्षांची प्रेयसी! प्रसारमाध्यमांचे बादशाह रूपर्ट मर्डोक पाचव्यांदा लग्न करणार

googlenewsNext

प्रसारमाध्यमांचा बादशाह म्हणून ओळख असलेले रूपर्ट मर्डोक हे ९२ व्या वर्षी पाचव्यांदा विवाहबंधनात अडकणार आहेत. अब्जाधीश असलेल्या या उद्योजकाने माजी पोलीस कॅप्टनसोबत लग्नाची घोषणा केली आहे. 

एन लेस्ली स्मिथ आणि मर्डोक यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅलिफोर्नियाच्या एका कार्यक्रमात ओळख झाली होती. मर्डोक चौथ्या पत्नीपासून गेल्या वर्षीच विभक्त झाले होते. तर ६६ वर्षीय लेस्लीच्या उद्योजक पतीचा १६ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. मर्डोक आणि लेस्ली यांचे लग्न  या वर्षी उन्हाळ्याच्या अखेरीला होणार आहे. 

मर्डोक यांनी चौथी पत्नी जेरी हॉल हिच्याशी गेल्या वर्षी फारकत घेतली होती. मर्डोक हे जगातील बड्या मीडियाचे मालक आहेत. न्यूयॉर्क पोस्ट चॅनलही त्यांच्याच मालकीचा आहे. त्यांनी याच चॅनलला आपल्या लग्नाविषयी माहिती दिली आहे. मी प्रेमात पडण्यास घाबरत होतो. परंतू मला माहितीये की हे माझे शेवटचे प्रेम असेल. हे खूप चांगले असेल. मी आनंदी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही दोघेही आमच्या आयुष्याचा दुसरा अर्धा भाग एकत्र घालवण्यास उत्सुक आहोत, असे मर्डोक म्हणालेत. तर त्यांची होणारी पत्नी म्हणाली की, मी 14 वर्षांची विधवा आहे. माझे पती देखील व्यवसायिक होते.

मर्डोक यांना आधीच्या तीन पत्नींपासून सहा मुले आहेत. फॉक्स न्यूज, यूकेमधील टॅब्लॉइड द सन सारख्या प्रकाशन संस्था मर्डोक यांच्या मालकीच्या आहेत. 

Web Title: 92 years old media king, 66 years old girlfriend! Media mogul Rupert Murdoch will marry for the fifth time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.