कारण ९८ वर्षाची झाली तरी आई ही आईच असते!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 04:07 PM2017-11-15T16:07:17+5:302017-11-15T16:21:21+5:30
या माय-लेकातलं हे नातं पाहून सगळेत अवाक् झाले आहेत.
लिवरपुल - या जगात आई आणि मुल यांच्यात एक वेगळंच नातं असतं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक स्त्रिला आई म्हणूनच जगायला आवडतं. लिव्हरपूल येथील हायटनमधील एक ९८ वर्षीय आई तिच्या ८० वर्षाच्या मुलाच्या देखभालीसाठी एका होमकेअरमध्ये राहायला गेल्याचे वृत्त नुकतंच समोर आलंय.
अॅडा किटींग आणि टॉम किटींग अशी या दोन मायलेकांची नावं आहेत. वयाच्या ९८ व्या वर्षीही त्या आपल्या ८० वर्षाच्या लेकाची सुश्रुषा करतायेय. टॉम हे गेलं वर्षभर होमकेअरमध्ये राहत आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत याकरता डॉक्टरांनी त्यांना तेथेच राहण्याचा सल्ला दिला. जेणेकरून तिकडच्या डॉक्टरांकडून टॉमी यांच्यावर योग्यरित्या देखरेख करता येईल. आपला मुलगा आपल्यापासून लांब राहत असल्याने अॅडा यांना अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून आपलं म्हातारपण विसरून त्या आपल्या मुलाकडे त्याची देखभाल करता यावी याकरता राह्यला गेल्या आहेत.
आणखी वाचा - ब्रेकअपनंतर त्यांच्या आठवणी विकण्यासाठी तरुणाने सुरु केला बाजार
टॉमी किटिंग आणि अॅडा किटिंग हे मुळचे युनायटेड किंग्डममधील व्हेव्हरट्री शहरातील आहेत. टॉमी यांनी लग्न केलं नसून ते आयुष्यभर अॅडा यांच्यासोबत राहिले आहेत. अॅडा आणि त्यांचे पती हॅरी यांना चार मुलं आहेत. हॅरी याचं निधन झाल्यानंतर अॅडा यांनीच आपल्या मुलांना सांभाळलं. अॅडा या स्वत: एक नर्स असल्याने टॉमीची योग्यरित्या देखभाल करू शकतात. टॉमी हे पेशाने पेंटर आणि डेकोरेटर होते. अॅडा यांची बाकीची तीन मुलं नियमित या होम केअरमध्ये आपल्या आईला आणि भावाला भेटण्यासाठी येत असतात.
या होम केअरचे व्यव्यस्थापक फिलिप डेनिल्स म्हणतात, ‘या माय-लेकांमध्ये एक वेगळंच नातं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षीही अॅडा आपल्या मुलाची योग्य काळजी घेतात. त्या स्वत: नर्स असल्याने रुग्णांची देखभाल कशी करावी याचं उत्तम ज्ञान त्यांच्याकडे आहे. तसंच एकाच होम केअरमध्ये आई-लेक एकत्र उपचार घेत असल्याचं पहिलंच उदारहण आहे.’आपल्या रुग्ण मुलाची शुश्रुषा करायला एखादी आई कोणत्याही वयात तयार होते. आईसाठी तिची मुलं सदृढ असणं महत्त्वाचं असतं. म्हणूनच वयाच्या ९८ व्या वर्षी आपल्या मुलाला काहीही कमी पडायला नको म्हणून अॅडा एका होम केअरमध्ये राहू लागल्या आणि बघता बघता त्यांच्या मुलाची स्थिती सुधारु लागली आहे.
सौजन्य - http://scubby.com