२०१४ नंतर अफगाणमध्ये ९,८०० अमेरिकी सैनिक

By admin | Published: May 28, 2014 02:46 AM2014-05-28T02:46:03+5:302014-05-28T02:46:03+5:30

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१४ नंतर अफगाणिस्तानात ९,८०० सैनिक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

9,800 American soldiers in Afghanistan after 2014 | २०१४ नंतर अफगाणमध्ये ९,८०० अमेरिकी सैनिक

२०१४ नंतर अफगाणमध्ये ९,८०० अमेरिकी सैनिक

Next

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१४ नंतर अफगाणिस्तानात ९,८०० सैनिक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१६ पर्यंत हे सर्व सैनिक मायदेशी बोलावले जाणार आहेत. एका अमेरिकी अधिकार्‍याने ही माहिती दिली असून ओबामा हे बुधवारी याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तथापि, २०१४ नंतर अफगाणिस्तानात अमेरिकी सैन्याची उपस्थिती हा द्विपक्षीय सुरक्षा करारावर नव्या अफगाण राष्ट्राध्यक्षाच्या मंजुरीशी संबंधित विषय आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांचा या करारास विरोध आहे. चालू वर्षअखेरीस अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सैनिक अफगाणिस्तानातून मायदेशी परतणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 9,800 American soldiers in Afghanistan after 2014

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.