अमेरिकेचे ९९ टक्के आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान भारतासाठी खुले
By admin | Published: June 26, 2016 04:40 PM2016-06-26T16:40:13+5:302016-06-26T16:40:13+5:30
अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांपैकी भारत असा एकमेव देश आहे ज्याला अमेरिकेचे ९९ टक्के अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान मिळू शकणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २६ - अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांपैकी भारत असा एकमेव देश आहे ज्याला अमेरिकेचे ९९ टक्के अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान मिळू शकणार आहे. महत्वाचा संरक्षण भागीदार म्हणून भारताला मान्यता मिळाल्याने भारताला हे तंत्रज्ञान मिळणार असल्याचे ओबामा प्रशासनातील अधिका-याने सांगितले.
भारताला मिळालेला दर्जा अनन्यसाधारण असून, आमच्या मित्र राष्ट्रांपैकी भारताला अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचा सर्वाधिक लाभ होणार आहे असे या अधिका-याने सांगितले. या महिन्याच्या सुरुवातील व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये चर्चा झाली.
त्यानंतर संयुक्त निवेदनात भारत महत्वाचा संरक्षण भागीदार असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. यापूर्वीच्या आम्ही असे करार केलेले नाही किंवा तसा धोरणात्मक निर्णयही घेतलेला नाही. आम्ही भारताबरोबरच अशा प्रकारचा करार केला आहे असे ओबामा प्रशासनातील अधिका-याने सांगितले. या करारातंर्गत भारताला अमेरिकेकडून दुहेरी वापराचे तंत्रज्ञान मिळणार आहे.