९९ वर्षांच्या आजींना बेड्यांसह तुरुंगात बसण्याची इच्छा
By admin | Published: March 2, 2017 04:25 AM2017-03-02T04:25:25+5:302017-03-02T04:25:25+5:30
बहुतेक सगळ््याच लोकांना दीर्घ आयुष्य तेही आनंदी आणि निरोगी लाभावे, असे वाटते.
लंडन : बहुतेक सगळ््याच लोकांना दीर्घ आयुष्य तेही आनंदी आणि निरोगी लाभावे, असे वाटते. परंतु वय जसजसे वाढत जाते, तशी काही स्वप्ने आता पूर्ण होणार नाहीत, याची खंतही वाटते. साधारणत: सुट्ट्यांच्या दिवशी कुठेतरी जाणे किंवा आपल्या नातवंडांना देवदेव करताना (चर्चमध्ये) बघणे या इच्छा असतात, परंतु नेदरलँडमधील अॅनी (वय ९९) यांना आपल्याला अटक व्हावी व हातकड्या घातल्या जाव्यात, अशी इच्छा होती. अर्थात, त्यांची इच्छा पूर्ण करायला पोलीस आनंदाने तयार झाले.
निजमिगन येथील डच पोलिसांनी अॅनी तुरुंगाच्या खोलीत बसल्या असल्याची सुंदर छायाचित्रे फेसबुक पेजवर अपलोड केली. पोलिसांनी छायाचित्राखाली लिहिले की, ‘अॅनी नावाच्या या बाई जवळपास १०० वर्षांच्या असून, माझ्या आजीच्या इच्छांच्या यादीतील ही एक इच्छा (अटक होण्याचा अनुभव घेणे व पोलीस कोठडीत राहणे) पूर्ण करण्यास मदत करा, असे अॅनी यांच्या नातीने आम्हाला म्हटले होते.’