सूर्याच्या पृष्ठभागावर 1 लाख किमी उंचीची भिंत!, आकार आठ पृथ्वींपेक्षाही मोठा, खगोलशास्त्रज्ञाने टिपले छायाचित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 07:19 AM2023-04-18T07:19:08+5:302023-04-18T07:19:42+5:30

Sun: अंतराळातील ग्रह, तारे यांची उत्तम छायाचित्रे टिपणारे खगोलशास्त्रज्ञ एदुआर्दो शाबर्गर पोपेऊ यांनी सूर्याचे एक अभूतपूर्व छायाचित्र काढले असून त्यात सूर्याच्या पृष्ठभागावरून प्लाझ्मा निघत असल्याचे दिसत आहे.

A 1 lakh km high wall on the surface of the Sun!, size eight bigger than the Earth, photographed by an astronomer | सूर्याच्या पृष्ठभागावर 1 लाख किमी उंचीची भिंत!, आकार आठ पृथ्वींपेक्षाही मोठा, खगोलशास्त्रज्ञाने टिपले छायाचित्र

सूर्याच्या पृष्ठभागावर 1 लाख किमी उंचीची भिंत!, आकार आठ पृथ्वींपेक्षाही मोठा, खगोलशास्त्रज्ञाने टिपले छायाचित्र

googlenewsNext

वॉशिंग्टन  : अंतराळातील ग्रह, तारे यांची उत्तम छायाचित्रे टिपणारे खगोलशास्त्रज्ञ एदुआर्दो शाबर्गर पोपेऊ यांनी सूर्याचे एक अभूतपूर्व छायाचित्र काढले असून त्यात सूर्याच्या पृष्ठभागावरून प्लाझ्मा निघत असल्याचे दिसत आहे. तो एखाद्या झऱ्यासारखा दिसतो. सूर्याच्या पृष्ठभागापासून एक लाख किलोमीटर उंचीपर्यंत प्लाझ्माची जणू भिंत तयार झाली होती. तिचा आकार इतका मोठा होता की, त्यामध्ये आठ पृथ्वी सहज सामावू शकल्या असत्या.
सूर्य हा प्रज्वलित वायूंच्या संयोगाने बनलेला आहे. हे वायू प्रत्यक्षात प्लाझ्माच्या स्वरूपात असतात. प्लाझ्मा ही वायूसारखीच पदार्थाची अवस्था आहे. सूर्यावर उसळलेला प्लाझ्मा ताशी ३६ हजार किमी वेगाने पुन्हा त्याच्या पृष्ठभागावर कोसळला.

चुंबकीय क्षेत्रांत होतात अनेक घडामोडी
n सूर्याच्या पृष्ठभागावर सध्याच्या दिवसांत अनेक घडामोडी होत आहेत. प्रत्येक दशकामध्ये सूर्याच्या चुंबकीय ध्रुवाने आपली जागा बदलली आहे. 
n सूर्यावर होणारे सनस्पॉटही कमी जास्त होताना दिसतात. प्रत्येक सौर चक्राच्या सुरुवातीला सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात फार घडामोडी होत नाहीत. मात्र, जसजसे हे चक्र वाढायला लागते, चुंबकीय क्षेत्रांतील घडामोडीही वाढायला लागतात.

गेल्या वर्षीही उसळला प्लाझ्मा
nखगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, गेल्या  वर्षी सूर्याच्या पूर्व भागात विशाल प्लाझ्मा निर्माण झाला होता. त्याचे छायाचित्र अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड श्राट्झ यांनी टिपले होते. 
nसूर्यापासून निघालेला  हा लूप ३ लाख २५ किमी लांबीचा होता. सूर्य व चंद्र यांच्यामध्येदेखील इतकेच अंतर आहे. अंतराळातील सूर्यासंबंधीच्या सर्व घडामोडींचा मागोवा घेणाऱ्या स्पेस वेदर डॉट कॉम या वेबसाइटने हे छायाचित्र प्रसिद्ध केले होते.
 

Web Title: A 1 lakh km high wall on the surface of the Sun!, size eight bigger than the Earth, photographed by an astronomer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.