देवानेच तारले... दहा दिवसांनंतर १७ वर्षीय युवतीची जिवंत सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 09:24 AM2023-02-17T09:24:15+5:302023-02-17T09:24:23+5:30
भूकंपबळींची संख्या तब्बल ४० हजारांवर
कहरामनमारस/अंताक्या : भूकंपाला दहा दिवस उलटल्यानंतर गुरुवारी तुर्कस्थानात एका किशोरवयीन मुलीला ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले. कहरामनमारस याच प्रांतात मांजरीलाही वाचविण्यात बचाव पथकांना यश आले आहे. बुधवारीही अनेक लोक जिवंत सापडले आहेत.
भूकंपात कोसळलेल्या अपार्टमेंटच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यानंतर १७ वर्षांच्या युवतीला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत नेण्यात येत असल्याचे यात दाखविण्यात आले. भूकंपबळींची संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे.
डोळ्यात आनंदाश्रू
n अलेना ओल्मेझ असे या तरुणीचे नाव असून, कायबासी परिसरातील ढिगाऱ्याखाली ती अडकली होती.
n अलेना जिवंत सापडल्याने तिच्या नातेवाइकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय म्हणून स्थानिक लोक या घटनेकडे पाहत आहेत.
n कारण, भूकंपाला २४८ तास उलटल्यानंतर ही युवती जिवंत सापडली.