२३ वर्षांच्या तरुणीचे ७१ वर्षांच्या व्यक्तीवर जडलं प्रेम,; आता सतावतेय भलतीच चिंता!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 12:53 PM2022-12-04T12:53:35+5:302022-12-04T12:59:07+5:30
समाजात स्वत:पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीवर प्रेम करणे योग्य मानले जात नाही.
प्रेम ही अशी गोष्टी आहे, जे तुम्हाला कोणावरही होऊ शकतं. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा त्या व्यक्तीचा चेहरा किंवा वय महत्त्वाचे नसते. अनेकदा असे अनेक प्रकरण समोर येतात ज्यात एखादी तरुणी किंवा पुरुष स्वत:पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींच्या प्रेमात पडतात.
समाजात स्वत:पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीवर प्रेम करणे योग्य मानले जात नाही. दुसरीकडे, भारताबाबत बोलायचे झाले तर, इथे जर मुलीचे वय मुलापेक्षा जास्त असेल आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करत असतील तर त्यांना लोकांची टीका सहन लागते.
नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात मुलगी २३ वर्षांची आहे आणि ती ज्याच्या प्रेमात पडली त्याचे वय साधारण ७१ वर्षे आहे. जेव्हा ७१ वर्षीय या प्रियकराने तरुणीला लग्नासाठी विचारल्यापासून ती खूप गोंधळात पडली. तरुणीला एका गोष्टीची खूप चिंता वाटतेय की, जर दोघांचे लग्न झाले तर तिला तिच्या ७१ वर्षीय प्रियकराची खूप काळजी घ्यावी लागेल.
तरुणी म्हणाली, मी माझ्या प्रियकरावर खूप प्रेम करते, पण लोक म्हणतात की, मी अशा म्हाताऱ्या माणसावर प्रेम करून माझा वेळ वाया घालवत आहे. मुलीने सांगितले की, ती तिच्या ७१ वर्षीय बॉयफ्रेंडसोबत गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. तरुणीने ७१ वर्षीय प्रियकराचे वर्णन करताना सांगितले की, तो त्याच्या वयापेक्षा खूपच फिट आणि सक्रिय आहे. अशा परिस्थितीत लग्नाचा आणि पुढील भविष्याचा विचार केल्यास आम्ही दोघेही दीर्घकाळ एकत्र राहू शकतो, असं आम्हाला वाटत असल्याचं तरुणीने सांगितलं.