जीवाणूंचे बारसे करण्याची ३०० वर्षे जुनी पद्धत बदलली; शास्त्रज्ञांनी ‘सीक-कोड’ला स्वीकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 12:00 PM2022-11-02T12:00:27+5:302022-11-02T12:01:04+5:30

शास्त्रज्ञांनी दीर्घ चर्चेनंतर ‘सीक-कोड’ला स्वीकारले

A 300-year-old way of naming bacteria has changed; Scientists adopted the 'seek-code' | जीवाणूंचे बारसे करण्याची ३०० वर्षे जुनी पद्धत बदलली; शास्त्रज्ञांनी ‘सीक-कोड’ला स्वीकारले

जीवाणूंचे बारसे करण्याची ३०० वर्षे जुनी पद्धत बदलली; शास्त्रज्ञांनी ‘सीक-कोड’ला स्वीकारले

Next

वॉशिंग्टन : अमेरिकन शास्त्रज्ञांनी जीवाणूंच्या नावासाठी नवीन जीनोम सिक्वेन्सिंग आधारित ‘सीक-कोड’ प्रणाली विकसित केली आहे. यामुळे बॅक्टेरियाचे नाव देण्याची ३०० वर्षे जुनी पद्धत बदलली आहे. नव्या प्रणालीमुळे  सूक्ष्मजीवांना समजून घेणे सोपे जाईल.

नवीन पिढीतील प्रतिजैविकांच्या ओळखीपासून ते कर्करोगावरील उपचार शोधण्यापर्यंतही मदत होऊ शकते. २०१८ मध्ये अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या मदतीने जीवाणूंना नाव देण्याची नवीन प्रणाली सुरू करण्यात आली. प्रदीर्घ चर्चेनंतर, सप्टेंबर २०२२ मध्ये याला ‘सीक-कोड’ म्हणून स्वीकारण्यात आले आहे. 

कार्ल लिनेसची द्वि-नाम प्रणाली

स्वीडनचे वनस्पतिशास्त्रज्ञ कार्ल लिनेस यांनी १७३७ मध्ये तार्किक द्वि-नाम (द्विपदी) प्रणाली सादर केली. यामध्ये सर्व सजीव, वनस्पती इत्यादींची नावे दोन भागांत ठेवली आहेत. पहिला भाग म्हणजे त्यांची जीन्स, जो आडनाव म्हणून वापरला जातो. दुसरा भाग त्या प्रजातीची वैशिष्ट्ये स्पष्ट करतो. यामुळे जवळजवळ सर्व सूक्ष्मजीवांना विशिष्ट नावे मिळणे शक्य झाले. जसे मानवाला ‘होमो सेपियन्स’ म्हणतात.

डीएनए सिक्वेन्सिंगची मदत

या प्रणालीद्वारे, जीवाणूंची एक प्रजाती विकसित करून आणि त्याचा प्रयोगशाळेत अभ्यास करण्याऐवजी, शास्त्रज्ञ त्याच्या डीएनए सिक्वेन्सिंगची मदत घेतील. त्यांना सूक्ष्मजीवाचा जीनोम मिळेल, जो डीएनएचा ब्लूप्रिंट असतो. डेटा क्रमवारी लावल्याने विशिष्ट प्रजाती इतर प्रजातींपासून वेगळे करण्यात मदत होईल.

Web Title: A 300-year-old way of naming bacteria has changed; Scientists adopted the 'seek-code'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.