धक्कादायक! 54 वर्षांच्या महिलेनं केली 114 वर्षांतील सर्वात मोठी मनी लाँड्रिंग, छाप्यात मिळालं कोट्यवधींचं घबाड!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 01:59 AM2023-01-20T01:59:00+5:302023-01-20T01:59:55+5:30

Housewife Arrest : यासंदर्भात पोलिसांचे म्हणणे आहे की, हे 114 वर्षांतील आतापर्यंतचे सर्वात मोठे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण असू शकते.

A 54-year-old woman did the biggest money laundering in hong kong, crores of rupees were found in the raid | धक्कादायक! 54 वर्षांच्या महिलेनं केली 114 वर्षांतील सर्वात मोठी मनी लाँड्रिंग, छाप्यात मिळालं कोट्यवधींचं घबाड!

धक्कादायक! 54 वर्षांच्या महिलेनं केली 114 वर्षांतील सर्वात मोठी मनी लाँड्रिंग, छाप्यात मिळालं कोट्यवधींचं घबाड!

googlenewsNext

काळा पैसा पांढरा करणाऱ्या अनेक टोळ्यांबद्दल आपण ऐकले अथवा वाचले असेल. बेकायदेशीरपणे काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रक्रियेला मनी लाँड्रिंग म्हटले जाते. नुकतेच मनी लाँड्रिंगशी संबंधित एक मोठे प्रकरण समोर आले आहे. यात स्वतःला गृहिणी म्हणून घेणाऱ्या एका महिलेच्या घरातून तब्बल 30 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर तिला 176 अब्ज रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

यासंदर्भात पोलिसांचे म्हणणे आहे की, हे 114 वर्षांतील आतापर्यंतचे सर्वात मोठे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण असू शकते. ही घटना हाँगकाँगमध्ये घडली आहे. येथे एका घरात काळ्या पैशाचे रुपांत पांढर्‍या पैशांत करण्याचे काम सुरू होते. या टोळीतील एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? -
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, एका 56 वर्षीय महिलेला आठवड्यापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेच्या फ्लॅटवर छापा टाकला, ती तेथे मनी लॉन्ड्रिंगचे रॅकेट चालवत होती. महिलेसह आणखी पाच जणांना अटक करण्यात आली. यानंतर आणखी चार जणांना ताब्यात घेण्यात आले. 

संबंधित महिलेवर 176 अब्ज रुपयांहूनही अधिक काळा पैसा पांढरा केरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी त्यांच्याकडे डझनभरहून अधिक खाती आढळून आली आहेत. फ्लॅटवर असलेले पैसे मोजण्यासाठी मशिन्सचा वापर करावा लागला. यावरूनच या संपूर्णप्रकरणाचा अंदाज लावला जाऊ शकतो. या छाप्यादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी 30 कोटी रुपयांची रोकडही जप्त केली आहे.

तपासात समोर आली धक्कादायक माहिती -
संबंधित खात्यांवर जानेवारी 2020 ते डिसेंबर 2022 या कालावधीत तब्बल 7600 हून अधिक वेळा व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपास अधिकाऱ्यांना अक्षरशः धक्का बसला. या अंतर्गत 176 अब्ज रुपये इकडून तिकडे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. सिंडिकेट चालवणाऱ्या कंपनीने 11 कंपन्या स्थापन केल्या होत्या. छाप्यादरम्यान पोलिसांना अनेक मशीन्स, बँक कार्ड आणि गोपनीय कागदपत्रेही सापडली आहेत.

Web Title: A 54-year-old woman did the biggest money laundering in hong kong, crores of rupees were found in the raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.