मोसादच्या चुकीचा मोठा खुलासा! इस्त्रायलच्या बॉर्डर जवळ हमासचे ओपन ट्रेनिंग सेंटर, येथूनच हल्ल्याची तयारी केली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 12:06 PM2023-10-13T12:06:56+5:302023-10-13T12:07:16+5:30
७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्त्रायलवर हल्ला केला.
गेल्या काही दिवसापासून हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. अनेकांचा या युद्धात मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता इस्त्रायलची एक मोठी चूक समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर दोन वर्षापूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हमासचे सैनिक रॉकेट, गोळीबार करण्याचे प्रशिक्षण घेत असल्याचे दिसत आहे. तसेच बनावट इस्रायली इमारतींमधून बनावट कैद्यांना पकडताना दिसत आहेत. हे प्रशिक्षण शिबिर गाझा आणि इस्रायलमधील पादचारी क्रॉसिंग इरेझ क्रॉसिंगच्या अगदी जवळ होते.
इस्रायल सैनिकांचा जोश हायवर! माजी पंतप्रधानांनी देखील शस्त्र हाती घेतले, ओन्ली फॅन्सचीही मॉडेल...
शनिवारी झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासचे सैनिक येथून घुसले होते आणि त्यांनी इस्रायली नागरिकांवर हल्ला केला होता. एक वर्षापूर्वी काढलेला आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हमासचे सैनिक पॅराग्लायडर्ससह टेक ऑफ, लँडिंग आणि हल्ल्याचा सराव करताना दिसत आहेत. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासच्या सैनिकांनी याचा वापर केला होता. गाझामधील किमान सहा ठिकाणी हल्ले करण्यासाठी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले आहे, असं यातून समोर आले आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले प्रशिक्षण स्थान गाझा-इस्त्रायल सीमेजवळील गस्ती क्षेत्रापासून फक्त एक मैल दूर होते. उर्वरित प्रशिक्षण क्षेत्रांपैकी एक मध्य गाझा आणि तीन दक्षिण गाझा येथे होते. इस्रायलच्या लष्करानेही पहिल्यांदाच आपली चूक मान्य केली आहे.हमासच्या हल्ल्याबाबत सुरक्षेतील त्रुटींबाबत इस्रायलने आपली चूक मान्य केली आहे. लष्करी प्रमुख लेफ्टनंट जनरल हर्जी हालेवी म्हणाले की, इस्रायली लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी इस्रायली संरक्षण दलावर आहे आणि शनिवारी आम्ही गाझा पट्टीच्या आसपासच्या भागात हे पूर्ण करण्यात अपयशी ठरलो.