सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 06:12 IST2024-10-02T06:12:38+5:302024-10-02T06:12:47+5:30
प्राथमिक आणि कनिष्ठ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची ही सहल होती. या दुर्घटनेतून बसचा चालक बचावला आहे.

सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
बँकॉक : थायलंडमधील एका शाळेच्या बसला मंगळवारी आग लागून त्यातील २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या देशातील उथाई थानी प्रांतातून या बसमधून विद्यार्थी व शिक्षक शालेय सहलीसाठी जात असताना ही भीषण दुर्घटना घडली.
प्राथमिक आणि कनिष्ठ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची ही सहल होती. या दुर्घटनेतून बसचा चालक बचावला आहे. मात्र, त्याने घटनास्थळावरून पलायन केले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बसला लागलेल्या आगीमुळे त्यातील २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
त्यांच्या मृतदेहांची ओळख पटविणेही अशक्य झाले आहे. या आगीमागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. (वृत्तसंस्था)
टायर फुटून ठिणग्या उडाल्या आणि त्यानंतर ही बस पेटल्याचे बोलले जाते. सहलीची ही बस अशी अचानक पेटली आणि त्यातून या बसमधून ४४हून अधिक लोक प्रवास करत होते, अशी माहिती थायलंडचे वाहतूक मंत्री सुरिया जंगरुंगरुंगकीट यांनी दिली. या अपघातात ही बस जळून खाक झाली.