झोपलेल्या व्यक्तीच्या नाकात झुरळ शिरले अन् पुढे जे काही घडले, ते पाहून डॉक्टरही चक्रावून गेले!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:54 PM2024-09-10T23:54:14+5:302024-09-10T23:55:26+5:30

हा धक्कादायक प्रकर घडला चीनच्या हैनान प्रांतातील हायकोऊ येथे...

A cockroach entered the sleeping person's nose and what happened next, even the doctor was shocked in china | झोपलेल्या व्यक्तीच्या नाकात झुरळ शिरले अन् पुढे जे काही घडले, ते पाहून डॉक्टरही चक्रावून गेले!

झोपलेल्या व्यक्तीच्या नाकात झुरळ शिरले अन् पुढे जे काही घडले, ते पाहून डॉक्टरही चक्रावून गेले!

झोपेत असताना एका व्यक्तीच्या नाकात झुरळ शिरले. मात्र, असे काही घढल्याचे तिला समजले नाही. त्रास होऊ लागल्यानंतर, संबंधित व्यक्ती डॉक्टकांकडे गेली. यानंतर जेव्हा डॉक्टरांनी तपासले, तेव्हा ते स्वतःच चक्रावून गेले. खरे तर, त्या रात्री संबंधित व्यक्तीला तिच्या नाकात आणि घशात काही तरी रेंगाळताना जाणवले होते. यामुळे तिला खोकलाही आला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी आराम मिळाला. यानंतर मात्र, श्वासात दुर्गंधी जाणवू लागल्याने ती व्यक्ती अस्वस्थ झाली. तीन दिवसांनंतरही तिला हा दुर्गंध जाणवतच होता.

पहिल्यांदा तपासले असता काहीही आढळले नाही -
हा धक्कादायक प्रकर घडला चीनच्या हैनान प्रांतातील हायकोऊ येथे. 58 वर्षीय पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, तिला दुर्गंधीबरोबरच पिवळी थुंकीही येऊ लागली. यानंतर त्या व्यक्तीने ताबडतोब हेनान रुग्णालयात ईएनटी तज्ञांना दाखवले. मात्र, वरील श्वसनमार्गाच्या तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नाही.

छातीच्या सीटी स्कॅनमध्ये आढळलं झुरळ -
छातीच्या सीटी स्कॅनमध्ये, डॉक्टरांना उजव्या खालच्या लोबच्या पोस्टरियर बेसल सेगमेंटमध्ये एक सावली आढळली. तपासादरम्यान डॉक्टरांना कफभोवती काहीतरी गुंडाळलेले आढळले. कफ साफ केल्यानंतर ते झुरळ असल्याचे समोर आले.
ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, यानंतर संबंधित व्यक्तीने रुग्णालयातील श्वसन आणि क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. लिन लिंग यांना दाखवले. यानंतर छातीच्या सीटी स्कॅनमध्ये  डॉक्टरांना उजव्या खालच्या लोबच्या बेसल सेगमेंटमध्ये एक सावली आढळली. डॉक्टरांना कफमध्ये काही तरी अडकले असल्याचे दिसून आले. ते साफ केल्यानंतर झुरळ असल्याचे निदर्शनास आले.

डॉक्टरांनी श्वसन नलीकेतून झुरळ बाहेर काढले. यानंतर नलीकाही वारंवार स्वच्छ केली. आता संबंधित व्यक्ती पूर्णपणे ठीक आहे.

Web Title: A cockroach entered the sleeping person's nose and what happened next, even the doctor was shocked in china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन