१० रिश्टर स्केलचा 'महा भूकंप' येणार, हजारो लोक मरणार, हाहाकार माजणार! कुणी केली ही भयावह भविष्यवाणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 12:04 IST2025-01-12T12:03:36+5:302025-01-12T12:04:21+5:30
नुकतीच खरी ठरलीय ट्रम्प यांच्या संदर्भातील 'ती' भविष्यवाणी...!

१० रिश्टर स्केलचा 'महा भूकंप' येणार, हजारो लोक मरणार, हाहाकार माजणार! कुणी केली ही भयावह भविष्यवाणी?
गेल्या काही महिन्यांपूर्वी, ओक्लाहोमा येथील पाद्री (Cleric) ब्रँडन डेल बिग्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न होण्यासंदर्भात भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी ट्रम्प एका ठिकाणी भाषण देत असताना, एका गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली गेली होती. आता त्याच पाद्र्याने (Cleric) आणखी एक मोठी भविष्यवाणी केली आहे, जी कुणाचाही थरकाप उडवेल. मेट्रोने दिलेल्या वृत्तानुसार, क्लेरिक बिग्स यांनी आता पृथ्वीवरील प्रलयासंदर्भात इशारा दिला आहे.
१० रिश्टर स्केलचा 'महा भूकंप' -
ब्रँडन डेल बिग्स यांनी म्हटले आहे की, परमेश्वराने त्यांना 10 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे एक दृश्य दाखवले आहे. जे संपूर्ण अमेरिकेत हजारो लोकांचा बळू घेऊ शकते. त्यांनी दावा केला आहे की, न्यू मॅड्रिड फॉल्ट लाइन हे या भूकंपाचे केंद्र असेल आणि तो मिसुरी, अर्कांसस, टेनेसी, केंटकी आणि इलिनोइसपर्यंत पसरलेल. यात हजारो लोकांचा मृत्यू होईल. सर्व घरे एका झटक्यात कोसळतील. एवढेच नाही तर, हा भूकंप एवढा तीव्र असेल की, जेव्हा त्याचा धक्का मिसिसिपी नदीला बसेल, तेव्हा तिची दिशा बदलेल, असे भाकितही त्यांनी केले.
१० रिश्टर स्केलचा भूकंप आला तर भयानक विनाश -
जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप २२ मे १९६० रोजी चिलीमध्ये सुमारे १,००० मैल लांबीच्या फॉल्टवर आला होता. याची तीव्रता ९.५ एवढी होती. यामुळे आलेल्या त्सुनामीने दक्षिण चिली, हवाई बेटे, जपान, फिलीपिन्स, पूर्व न्यूझीलंड, आग्नेय ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये भयानक विनाश घडवून आला होता. जीवितहानीच्यादृष्टीने, जगातील सर्वात मोठा भूकंप १५५६ मध्ये चीनमध्ये आला होता, यात ८.३० लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
10 रिश्टर स्केलचा भूकंप येऊ शकतो?
महत्वाचे म्हणजे, बिग्स यांच्या या भविष्यवाणीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, १० अथवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप येऊच शकत नाहीत. भूकंपाची तीव्रता तो ज्या फॉल्टवर येतो त्याच्या लांबीशी संबंधित असते. अर्थात, फॉल्ट जेवढा लांब, तेवढा तीव्र भूकंप येऊ शकतो. मात्र सध्या, पृथ्वीवर कोणताही फॉल्ट एवढा मोठा नाही की, एवढा मोठा भूकंप येईल.
केवळ बिग्सच नाही तर बाबा वांगा, नोस्ट्राडेमस आदींनीही २०२५ मध्ये जगात मोठी आपत्ती येण्यासंदर्भात इशारा दिला आहे. असे झाल्यास मानवजातीचे मोठे नुकसान होऊ शकते.