भारतात अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव होतो? अमेरिकन पत्रकाराच्या प्रश्नावर मोदींनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:06 AM2023-06-23T00:06:56+5:302023-06-23T00:08:23+5:30
भारतातील अल्पसंख्याक समुदायाबद्दल अमेरिकेतील पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला
वाशिंग्टन - अमेरिकेच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान आज वॉश्गिंटन डीसीत होते. मोदींच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसला पोहचले. याठिकाणी मोदींचे भव्यदिव्य स्वागत झाले. तिथे मोदी आणि बायडन प्रशासन यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. तर, दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. त्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तसेच, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.
भारतातील अल्पसंख्याक समुदायाबद्दल अमेरिकेतील पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला. त्यावेळी, लोक म्हणतात.. भारतातील अल्पसंख्यांक समुदायासोबत भेदभाव केला जातो, असं ह्युमन राईट्स आणि लोकांचं म्हणणं आहे? असा प्रश्न विचाारण्यात आला. त्यावर, मोदींनी भारत हा लोकशाहीप्रधान देश असल्याचं म्हटलं. मला आश्चर्य होतंय की तुम्ही म्हणता लोकं म्हणतात.. लोकं म्हणतात... पण भारत लोकशाहीप्रधान देश आहे. जसं की राष्ट्रपती जो बायडन यांनी म्हटलं की, भारत आणि अमेरिका दोन्ही देशांचा डीएनए लोकशाही आहे, लोकशाही आमच्या रक्तात आहे, लोकशाही आम्ही जगतो, आमच्या पूर्वजांनी संविधानच्या रुपाने ते शब्दबद्ध केलं आहे, असे मोदींनी म्हटले.
#WATCH मुझे आश्चर्य है कि आप कह रहे हैं कि लोग कहते हैं। लोग कहते हैं नहीं बल्कि भारत लोकतांत्रिक है। जैसा कि राष्ट्रपति बाइडेन ने कहा भारत और अमेरिका दोनों के DNA में लोकतंत्र है। लोकतंत्र हमारी रगो में है, लोकतंत्र को हम जीते हैं। हमारे पूर्वजों ने उसे शब्दों में डाला है। हमारा… pic.twitter.com/MVEbImEH3t
— ANI_HindiNews (@AHindinews) June 22, 2023
तसेच, आमचं सरकार लोकशाहीच्या मुलभूत तत्त्वांच्या आधारावरच चालत आहे. आमचं संविधान आणि आमचं सरकार, आम्ही सिद्ध केलंय की, जात, पंथ, धर्म, लिंग यांसारख्या कुठल्याही भेदभावाला तेथे थारा नाही. जेव्हा आपण लोकशाहीची गोष्ट करतो, लोकशाही जगतो, तेव्हा भेदभावाचा कुठलाही प्रश्न उपस्थित होत नाही. म्हणूनच, भारत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या मूलभूत सिद्धांतांना घेऊन चालत आहे, असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिले.
जगभरातील अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची भागिदारी
आजचा दिवस भारत आणि अमेरिका यांच्या संबंधासाठी ऐतिहासिक आहे. आजच्या आमच्या चर्चेतून आणि घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयातून कॉम्प्रिहेंसिव ग्लोबल स्ट्रैटेजिक पार्टनरशिपमध्ये आमचा नवीन अध्याय जोडला गेला आहे. यातून एक नवीन दिशा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत म्हटलं. भारत-अमेरिका मैत्री ही केवळ दोन्ही देशांसाठीच महत्त्वपूर्ण नसून जगातील अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाची आहे. आज अमेरिका भारताचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर असून दोन्ही देशातील व्यापारासंबंधित प्रलंबित मुद्दे संपवून एक नवी सुरुवात करणार आहोत.
अमेरिकेत १० लाख नोकऱ्यांसाठी मदत
आम्ही एकत्र येऊन असिमीत क्षमतेच्या भविष्याची दारं खुली करत आहोत. स्वच्छ ऊर्जा परिवर्तनमध्ये तेजी आणण्यासाठी अंतराळातील उड्डाणांवर सहयोग आणि क्वांटम कंप्यूटिंग व कृत्रिम बुद्धिमत्तेवर सहकार्याची गरज आहे. एयर इंडियाद्वारे बोइंग विमान खरीदीच्या करारामुळे अमेरिकेत १० लाख नोकऱ्यांची मदत होईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोदींसमवेतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.