बिहारमधील जातिनिहाय जनगणनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 02:45 PM2023-10-06T14:45:59+5:302023-10-06T14:46:32+5:30

Bihar Caste Census: बिहार सरकारने प्रसिद्ध केलेल्या जातिनिहाय जनगणनेचे आकडे नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

A major decision of the Supreme Court on the caste-wise census in Bihar, the order was given | बिहारमधील जातिनिहाय जनगणनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश  

बिहारमधील जातिनिहाय जनगणनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश  

googlenewsNext

बिहार सरकारने प्रसिद्ध केलेल्या जातिनिहाय जनगणनेचे आकडे नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, या जातिनिहाय जनगणनेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या जनगणनेला कुठल्याही प्रकराची स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच या प्रकरणी विस्तृत सुनावणी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच जातीय जनगणनेच्या सर्व पैलूंचा विचार करण्याची आवश्यतता असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले. गेल्या दोन ऑक्टोबर रोजी जातीय जनगणनेचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. ती याचिका स्वीकार करताना सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी आजची तारीख निश्चित केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एसव्हीएम भट्टी यांच्या बेंचने केली.

बिहार सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जातिनिहाय आकडेवारीनुसार बिहारची एकूण लोकसंख्या १३.०७ कोटी असून, त्यात ईबीसी ३७ टक्के. ओबीसी २७.१३ टक्के, अनुसूचित जाती १९ टक्के, तर मुस्लीम समुदाय १७.७० टक्के आहे. तसेच ओबीसी समुहामध्ये १४ टक्क्यांपेक्षा काही अधिल लोक हे यादव समुदायातील आहेत. 

बिहारमध्ये ओबीसी समुदायामध्ये समाविष्ट असलेल्या यादव समाजाची संख्या राज्यातील एकूण लोकसंख्येच्या १४.२७ टक्के एवढी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव हे यादव समाजातीलच आहेत. बिहारमध्ये यादव समाजाची संख्या सर्वाधिक आहे. गतवर्षी केंद्रातील मोदी सरकारने सर्वसाधारण जनगणनेवेळी अनुसूचित जाती आणि जमाती वगळून इतरांची जनगणना करता येणार नाही असं केंद्र सरकारनं सांगितल्यानंतर बिहार सरकारने जातिनिहास जनगणनेची घोषणा केली होती.  

Web Title: A major decision of the Supreme Court on the caste-wise census in Bihar, the order was given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.