तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 08:08 PM2024-10-23T20:08:49+5:302024-10-23T20:17:01+5:30
तुर्कीची राजधानी अंकारा येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात अनेक जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.
तुर्की येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. तुर्कीची राजधानी अंकारा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेकांचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तुर्कीच्या मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी TUSAS च्या परिसरावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.
इराणसाठी ७ इस्रायली करत होते हेरगिरी; अण्वस्त्रांपासून लष्करी तळांची माहिती दिली
त्यांनी अली येर्लिकाया यांनी राजधानीच्या बाहेरील भागात असलेल्या तुर्किये एरोस्पेस इंडस्ट्रीजवर झालेल्या हल्ल्याबाबत माहिती दिली नाही.
याबाबत मंत्र्यांनी एक सोशल मिडिया पोस्ट लिहिली आहे, या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "तुर्कीए एरोस्पेस इंडस्ट्रीज अंकारा कहरामंकझान सुविधांवर दहशतवादी हल्ला करण्यात आल.
या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, यामध्ये हल्लेखोर गोळीबार करताना दिसत आहेत.
सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बदलादरम्यान हल्लेखोरांचा एक गट टॅक्सीतून संकुलाच्या प्रवेशद्वारावर आला. एका हल्लेखोराने बॉम्बचा स्फोट केला, तर इतर हल्लेखोरांनी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार सुरूच ठेवला. सुरक्षा दल, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी पाठवण्यात आले. कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
कुर्दिश अतिरेकी, इस्लामिक स्टेट गट आणि डाव्या अतिरेक्यांनी यापूर्वी देशात हल्ले केले आहेत.
Turkey Interior Minister Ali Yerlikaya tweets "A terrorist attack was carried out against the Turkish Aerospace Industries Inc. (TUSAŞ) Ankara Kahramankazan facilities. Unfortunately, we have martyrs and injured people after the attack. The public will be informed about… pic.twitter.com/hhTFgCBb7J
— ANI (@ANI) October 23, 2024