धक्कादायक! नराधमाने मुलांसमोर केली पत्नीची हत्या; मृतदेह टाकला उकळलेल्या पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 12:29 PM2022-07-15T12:29:13+5:302022-07-15T12:31:28+5:30

पाकिस्तानमधील कराची येथील एका नराधमाने आपल्या सहा मुलांसमोर पत्नीची हत्या करून मृतदेह उकळलेल्या पाण्यात टाकला.

A man in Pakistan has killed his wife in front of his six children | धक्कादायक! नराधमाने मुलांसमोर केली पत्नीची हत्या; मृतदेह टाकला उकळलेल्या पाण्यात

धक्कादायक! नराधमाने मुलांसमोर केली पत्नीची हत्या; मृतदेह टाकला उकळलेल्या पाण्यात

Next

कराची: पाकिस्तानातून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका व्यक्तीने आपल्या सहा मुलांसमोर कथितपणे आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह उकळलेल्या पाण्यात टाकला आहे. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कराची शहरातील गुलशन-ए-एकबाल भागातील एका खासगी शाळेच्या स्वयंपाकगृहामधून नर्गिस नावाच्या एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांच्या माहितीनुसार, बाजौर एजन्सीचा रहिवाशी असलेला पती आशिक हा एका शाळेत वॉचमेन म्हणून कार्यरत होता. जवळपास आठ ते नऊ बंद असलेल्या शाळेमध्येच तो राहत होता. 

उशीने गळा दाबून केली हत्या 
 
जिल्ह्याचे माजी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अब्दुर रहीम शेराझी यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हटले की, सध्या अन्य तीन मुलांचा ताबा पोलिसांकडे आहे. शेराझींनी सांगितले की, या घटनेनंतर त्या लहान मुलांना धक्का बसला असून ती खूप घाबरली आहेत. मुलांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पतीने आपल्या पत्नीची उशीने गळा दाबून हत्या केली. 

अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडले

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा एक पाय शरिरापासून वेगळा झाला आहे. या घटनेमागे नेमकं कोणतं कारण आहे हे अद्याप समोर आलं नाही. मात्र आरोपीने पत्नीला अवैध संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले होते आणि असे करण्यास पत्नीने नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली आहे, असे बोलले जात आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.

Web Title: A man in Pakistan has killed his wife in front of his six children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.