धोका वाटला तर त्यांच्या मानेवर अन् अंडर आर्म्समध्ये..., हमासच्या दहशतवाद्याकडं सापडलं बंदिवानांना मारायचं मॅन्युअल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 04:13 PM2023-10-22T16:13:20+5:302023-10-22T16:14:15+5:30

हमासच्या दहशतवाद्याचे एक मॅन्यूअल मिळाले आहे. यात, लोकांना कशा प्रकारे बंदी बनवायचे? बंदी बनवल्यानंतर, केव्हा आणि काय करायचे? हे सांगण्यात आले आहे. 

a manual found at the Hamas terrorists for killing israel captives | धोका वाटला तर त्यांच्या मानेवर अन् अंडर आर्म्समध्ये..., हमासच्या दहशतवाद्याकडं सापडलं बंदिवानांना मारायचं मॅन्युअल

धोका वाटला तर त्यांच्या मानेवर अन् अंडर आर्म्समध्ये..., हमासच्या दहशतवाद्याकडं सापडलं बंदिवानांना मारायचं मॅन्युअल

हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर, जवळपास दोनशेहून अधिक लोकांचे अपहरण केले आहे. द टेलीग्राफला हमासच्या दहशतवाद्याचे एक मॅन्यूअल मिळाले आहे. यात, लोकांना कशा प्रकारे बंदी बनवायचे? बंदी बनवल्यानंतर, केव्हा आणि काय करायचे? हे सांगण्यात आले आहे. 

या आठ पानांच्या मॅन्यूअलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांना परिसरात अराजक निर्माण करण्यास आणि ओलिसांपैकी कुणी अडथळा निर्माण करत असेल अथवा कुणाचा धोका वाटत असेल, तर त्याला ठार मारण्यास सांगण्यात आले आहे.
 
'बंदीवानांना ढाल बनवा' -
जर एखाद्याकडून आपले म्हणणे पूर्ण करून घ्यायचे असेल तर त्याला विजेचा शॉक द्या. मुलांचे हात-पाय बांधा. जर स्वतःला वाचवायची वेळ आली, तर बंदिवानांचा ढालीप्रमाणे वापर करा, असे या मॅन्यूअलमध्ये सांगण्यात आले आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, हे मॅन्यूअल गेल्या वर्षीचे असून ते हमासच्या एका मृत दहशतवाद्याकडे सापडले आहे.

"हे एक गोपणीय दस्तऐवज असून सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. ऑर्डर मिळाल्या शिवाय सोबत बाळगण्यास मनाई आहे." असे या मॅन्यूअलच्या पहिल्याच पानावर लिहिण्यात आले आहे. एवडेच नाही, तर एखाद्या व्यक्तीवर चाकूने वार केल्यास मानेला, मणक्याला आणि अंडर आर्म्समध्ये सर्वात घातक जखम होईल, असेही या मॅन्यूअलमध्ये सांगण्यात आले असल्याचे वॉशिंगटन पोस्टने म्हटले आहे.

 

Web Title: a manual found at the Hamas terrorists for killing israel captives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.