नित्यानंदचा बनावट देश ‘कैलासा’सोबत पॅराग्वेच्या अधिकाऱ्याने केला करार, सत्य समजल्यावर...  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 02:56 PM2023-12-01T14:56:35+5:302023-12-01T14:56:58+5:30

गुन्हे दाखल झाल्यानंतर भारतातून फरार झालेला स्वामी नित्यानंद याने दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर येथे जात आपला कैलासा नावाचा देश स्थापन ...

A Paraguayan official made an agreement with Nityananda's fake country 'Kailasa', after realizing the truth... | नित्यानंदचा बनावट देश ‘कैलासा’सोबत पॅराग्वेच्या अधिकाऱ्याने केला करार, सत्य समजल्यावर...  

नित्यानंदचा बनावट देश ‘कैलासा’सोबत पॅराग्वेच्या अधिकाऱ्याने केला करार, सत्य समजल्यावर...  

गुन्हे दाखल झाल्यानंतर भारतातून फरार झालेला स्वामी नित्यानंद याने दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर येथे जात आपला कैलासा नावाचा देश स्थापन केला होता. हा कैलासा देश आणि स्वामी नित्यानंद वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. दरम्यान, आता दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वेमध्ये कैलासावरून निर्माण झालेल्या वादानंतर कैलासा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

नित्यानंद स्वामीचा स्वयंघोषित देश असलेल्या कैलासासोबत एक करार केल्याने पॅराग्वेने देशाचे एक वरिष्ठ अधिकारी अर्नाल्डो चामोरो यांना बडतर्फ केलं आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार अर्नाल्डो यांनी कैलासासोबत सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र कैलासा नावाचा कुठलाही देश अस्तित्वात नसल्याचे समोर आल्यानंतर पॅराग्वेने अर्नाल़्डो चामोरो यांना बडतर्फ केलं आहे. 

बडतर्फ केलेले अधिकारी अर्नाल्डो चामोरो यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, दक्षिण अमेरिकी बेटावर असलेल्या कैलासाच्या कथित अधिकाऱ्यांसोबत करार केल्यानंतर मला कृषिमंत्र्य़ांचे प्रमुख अधिकारी या पदावरून बडतर्फ करण्यात आलं आहे.  

Web Title: A Paraguayan official made an agreement with Nityananda's fake country 'Kailasa', after realizing the truth...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.