"देशद्रोहाच्या आरोपात १० वर्षे तुरुंगात डांबण्याचा डाव; मात्र, मी लढत राहणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 12:24 PM2023-05-16T12:24:23+5:302023-05-16T12:24:32+5:30

माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पाकिस्तानी लष्करावर आरोप

A plot to jail me for 10 years on charges of treason; however, I will continue to fight says imran khan | "देशद्रोहाच्या आरोपात १० वर्षे तुरुंगात डांबण्याचा डाव; मात्र, मी लढत राहणार"

"देशद्रोहाच्या आरोपात १० वर्षे तुरुंगात डांबण्याचा डाव; मात्र, मी लढत राहणार"

googlenewsNext

लाहोर : मला देशद्रोहाच्या आरोपाखाली पुढील १० वर्षे तुरुंगात डांबण्याचा पाकिस्तानी लष्कराचा डाव आहे. मात्र वाईट प्रवृत्तींविरोधात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी लढत राहीन, असे पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. 

खटल्यांच्या सुनावणीसाठी इम्रान खान लाहोर उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणीसाठी हजर झाले. त्याआधी इम्रान खान यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी अटकेत असताना उसळलेल्या हिंसाचाराचे निमित्त करून एक कट शिजविण्यात आला. माझी पत्नी बुशरा बेगम हिला तुरुंगात टाकण्याचा तसेच देशद्रोहाच्या आरोपाखाली मला पुढील दहा वर्षे कारावासाची शिक्षा देण्याचे लष्कराने ठरविले आहे.

इम्रान खान प्रमुख पीटीआय या पक्षाच्या नेत्यांची लाहोर येथे सोमवारी बैठक झाली. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर सध्या १०० पेक्षा अनेक गुन्हे दाखल असून, त्यांना जामीन मंजूर झाला आहे. 

आज पुन्हा अटक होणार?
इम्रान खान यांनी सांगितले की, मला उद्या, मंगळवारी पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. त्यावेळी पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात येईल, अशी शक्यता आहे.

Web Title: A plot to jail me for 10 years on charges of treason; however, I will continue to fight says imran khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.