उशीखाली सापडलं धार्मिक पुस्तक, ग्राहकांनी सेक्स वर्करला मारलं मग जाळलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 04:42 PM2022-06-18T16:42:15+5:302022-06-18T16:42:32+5:30

कस्टमरने आपल्या साथीदारांसोबत मिळून सेक्स वर्करला मारहाण करून तिची हत्या केली आणि मग तिला आगीच्या हवाली केलं. ही घटना नायजेरियाच्या Lagos शहरातील आहे. 

A sex worker killed and burnt after customer found Quran in her bedroom | उशीखाली सापडलं धार्मिक पुस्तक, ग्राहकांनी सेक्स वर्करला मारलं मग जाळलं!

उशीखाली सापडलं धार्मिक पुस्तक, ग्राहकांनी सेक्स वर्करला मारलं मग जाळलं!

googlenewsNext

एका सेक्स वर्करच्या रूममध्ये उशीखाली धार्मिक पुस्तक सापडल्यानंतर कस्टमरने तिच्यावर हल्ला केला. कस्टमरने आपल्या साथीदारांसोबत मिळून सेक्स वर्करला मारहाण करून तिची हत्या केली आणि मग तिला आगीच्या हवाली केलं. ही घटना नायजेरियाच्या Lagos शहरातील आहे. 

Pulse.ng नुसार, मृत महिलेची ओळख हन्ना सालिउ अशी पटली आहे. ती Lagos शहरात सेक्स वर्करच्या रूपात काम करत होती. नुकताच एक कस्टमर जेव्हा हन्नाला पेमेंट करत होता, तेव्हा हन्नाने त्याचा पाठलाग केला आणि आरोप लावला की, तो तिचे पैसे चोरून पळत होता. 

कस्टमरने 1 हजार नायरा पेमेंट केलं होतं, पण हन्नाने आरोप केला की, त्याने 5 हजार नायरा चोरी केले. यावरूनच कस्टमरसोबत तिचा वाद झाला. यावर कस्टमर म्हणाला की, हन्नाने आरोप लावण्याऐवजी आपल्या रूमला व्यवस्थित चेक केलं पाहिजे. ज्यानंतर कस्टमर आपल्या काही साथीदारांसोबत हन्नाची रूम चेक करू लागला.

रिपोर्टनुसार, रूम चेक करण्यादरम्यान लोकांना हन्नाच्या बेडवरील उशीखाली एक धार्मिक पुस्तक मिळालं. जे बघून कस्टमर तिच्यावर भडकले आणि त्यांनी तिला मारहाण सुरू केली. या लोकांनी हन्नाला इतकी मारहाण केली की, तिचा मृत्यू झाला. हत्येनंतर त्यांनी तिची बॉडी जाळली.

Lagos Police च्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या घटनेतील संशयीतांची ओळख  मूसा, सरौता मोनसुर आणि सूरजो युसूफच्या रूपात झाली. असं सांगितलं जातं की, संशयीतांनी आधी तर सेक्स वर्कर हन्नाला मारहाण केली नंतर तिला चाकू मारला. त्यानंतर तिला रूममधून बाहेर काढून आगीच्या हवाली केलं.

Web Title: A sex worker killed and burnt after customer found Quran in her bedroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.