कडक उन्हामुळे अब्राहम लिंकन यांचा पुतळाही वितळला; अमेरिकेत उष्णतेचा प्रकोप; तापमान ४५ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 06:39 AM2024-06-27T06:39:24+5:302024-06-27T06:39:32+5:30

सध्या भारतासह जगभरात उष्णतेच्या लाटा येत असून, यामुळे आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

A statue of Abraham Lincoln also melted due to the hot sun A heat wave in America; Temperature at 45 degrees | कडक उन्हामुळे अब्राहम लिंकन यांचा पुतळाही वितळला; अमेरिकेत उष्णतेचा प्रकोप; तापमान ४५ अंशांवर

कडक उन्हामुळे अब्राहम लिंकन यांचा पुतळाही वितळला; अमेरिकेत उष्णतेचा प्रकोप; तापमान ४५ अंशांवर

न्यूयॉर्क : सध्या भारतासह जगभरात उष्णतेच्या लाटा येत असून, यामुळे आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता वाढत्या उष्णतेमुळे पुतळेही वितळत असल्याचे समोर आले आहे. कडक उन्हामुळे वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा सहा फूट उंच मेणाचा पुतळा वितळला आहे. अगदी काही वेळातच मूर्तीचे डोके वितळले आणि बाजूला पडले. लिंकन मेमोरिअलच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या या पुतळ्याचे डोके काढून टाकण्यात आले आणि पायही डोक्यापासून वेगळा करण्यात आला आहे. बुधवारपर्यंत दुसरा पायही उन्हामुळे वितळला आहे.

मूर्तीचे मोठे नुकसान 
कल्चरल डीसी या पुतळ्याची निर्मिती करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने सांगितले की, आमच्या कर्मचाऱ्यांनी लिंकन यांच्या पुतळ्यातील त्यांचे डोके पडू नये किंवा तुटू नये म्हणून बाजूला काढून ठेवले. तीन हजार पौंडांचा हा मेणाचा पुतळा मेणबत्तीप्रमाणे पेटवला जाणार आहे आणि कालांतराने त्यात बदल केला जाईल; परंतु अत्यंत उष्णतेमुळे या मूर्तीचे बरेच नुकसान झाले आहे. 

तापमानाचा विक्रम मोडला
- अमेरिकेतील अनेक भागांत तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. अनेक भागांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअस आहे.
- हवामान खात्याने मध्य आणि पूर्वेकडील भागांत राहणाऱ्या लोकांना या महिन्यातील तीव्र उष्णतेपासून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

कुठे बसवला होता पुतळा?
- संस्थेने सांगितले की, लिंकन यांच्या पुतळ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मेणाचा गोठणबिंदू -१४० अंश फॅरेनहाइट आहे. ४० एकर : कॅम्प बार्कर नावाचा हा पुतळा सप्टेंबरपर्यंत शाळेत ठेवण्यात येणार होता.
- हा पुतळा गृहयुद्धातील निर्वासितांच्या इतिहासावर आधारित होती. निर्वासित शिबिरामध्ये पूर्वी गुलाम बनवलेले आणि मुक्त केलेले आफ्रिकन अमेरिकन राहत होते. 
- गॅरिसन एलिमेंटरी आता जिथे उभी आहे त्या जागेवर कॅम्प बार्करची स्थापना करण्यात आली. 
अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेतील गुलामगिरी संपवण्याचे श्रेय लिंकन यांना दिले जाते.

Web Title: A statue of Abraham Lincoln also melted due to the hot sun A heat wave in America; Temperature at 45 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.