Aamir Liaquat Hussain Death: पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत यांचा संशयास्पद मृत्यू, तीन लग्नं, घटस्फोटांमुळे आले होते चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 03:11 PM2022-06-09T15:11:37+5:302022-06-09T15:12:30+5:30
Aamir Liaquat Hussain Death: पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत यांचा कराचीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार ते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत सापडले. ते ५० वर्षांचे होते.
इस्लामाबाद - पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत यांचा कराचीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार ते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत सापडले. ते ५० वर्षांचे होते. जियो टीव्हीने त्यांच्या नोकराच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. आमिर लियाकत हे हल्लीच दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेत तिसरं लग्न केल्यानं ते चर्चेत आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांचा न्यूड व्हिडीओ समोर आल्यानेही वाद झाला होता.
आमीर लियाकत यांचं वय केवळ ५० वर्षे होतं. १९७२ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. आमीर लियाकत यांनी तीन लग्नं केली होती. दुसरी पत्नी तोबा अन्वर हिच्याशी त्यांनी २०१८ मध्ये लग्न केलं होतं. तिला घटस्फोट दिल्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी दानिया शाह हिच्याशी लग्न केलं होतं.
आमीर लियाकत हे ४९ वर्षांचे तर दानिया शाह ही केवळ १८ वर्षांची असल्याने त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. दरम्यान, हे लग्न फार दिवस चालले नाही. गंभीर आरोप करत दानियाने आमिर लियाकत यांच्यापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तिचे नाव दानिया आमिरवरून बदलून दानिया मलिक केले होते. दरम्यान, आमीर लियाकत यांचा एक बेडरुम व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ त्यांच्या बेडरूममधला होता, त्यामध्ये ते बर्फाचे ड्रग्स(Ice Drugs) घेताना दिसत होते. हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला अलविदा करण्याची घोषणा केली होती.