द्विधा मन:स्थितीतील मतदार निर्णायक
By Admin | Published: October 25, 2016 04:50 AM2016-10-25T04:50:28+5:302016-10-25T04:50:28+5:30
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीला दोन आठवडे शिल्लक असताना डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड
- गायती सिंग, नवी दिल्ली
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीला दोन आठवडे शिल्लक असताना डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड
ट्रम्प यांच्यापेक्षा हिलरी या ७ अंकांनी आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
असे मानले जात आहे की, ९० टक्के मतदारांनी आपला निर्णय ठरविला आहे, तर ५ ते ८ टक्के मतदारांनी अद्याप क्लिंटन की ट्रम्प याबाबत निर्णय घेतलेला नाही. २९ जुलैच्या एका आकडेवारीनुसार हिलरी क्लिंटन यांना ४४.३ टक्के लोकांचे समर्थन होते, तर डेमोक्रॅटिकच्या संमेलनानंतर यात आणखी भर पडली आहे. अनिश्चित मतदारांमध्ये त्या नागरिकांचा समावेश आहे ज्यांनी कुणाला मतदान करायचे याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही.
फिलाडेल्फियात एका मतदाराने यावर सूचक भाष्य केले होते. यापैकी एका उमेदवाराची निवड करणे म्हणजे हार्ट अटॅक की स्ट्रोक? यापैकी एकाची निवड केल्यासारखे आहे, असा तिरकस सवालही या मतदाराने केला होता. अर्थात द्विधा मन:स्थितीतील मतदार प्रत्येक निवडणुकीत असतात. पण यंदा चित्र थोडे वेगळे आहे. कारण, अनेक मतदार दोन्ही उमेदवारांबाबत प्रतिकूल आहेत. या निवडणुकीत तरुण मतदारांची संख्या अधिक आहे.
जुलैमधील सर्वेक्षणानुसार, १८ ते २९ वयोगटातील ६० टक्के मतदार हिलरींसाठी प्रतिकूल आहेत, तर यातील ३१ टक्के मतदार अनुकूल आहेत. सीबीएस पोलनुसार, ज्यांचे मत अद्याप अनिश्चित आहे त्यांचे या दोन्ही उमेदवारांबाबत सकारात्मक मत नाही. तरीही यातील ५ टक्के नागरिक हे क्लिंटन यांच्याबाबत थोडे मवाळ आहेत, तर ३ टक्के नागरिक ट्रम्प यांच्याकडून झुकलेले दिसतात.