अबब ! 1285 कोटी रुपये, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार
By admin | Published: April 29, 2017 02:33 PM2017-04-29T14:33:28+5:302017-04-29T14:33:59+5:30
गतवर्षी म्हणजेच 2016 मध्ये सुंदर पिचाई यांना पगार म्हणून तब्बल 1 हजार 285 कोटी रुपये मिळाले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
ह्यूस्टन, दि. 29 - गूगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यशाचे शिखर गाठत असताना पगाराच्या बाबतीतही नवं शिखर गाठलं आहे. गतवर्षी म्हणजेच 2016 मध्ये सुंदर पिचाई यांना पगार म्हणून तब्बल 1 हजार 285 कोटी रुपये मिळाले आहेत. म्हणजेच याचा अर्थ सुंदर पिचाई महिन्याला जवळपास 100 कोटींची कमाई करत आहेत. सुंदर पिचाई यांना मिळालेली ही रक्कम 2015 मध्ये मिळालेल्या रक्कमेच्या दुप्पट आहे. 2016 मध्ये त्यांना तब्ब्ल 6.50 लाख डॉलर्स म्हणजेच जवळजवळ चार कोटी 17 लाखांची रक्कम देण्यात आली होती. 2015 मध्ये मिळालेल्या पगारापेक्षा हा कमी होता. 2015 मध्ये पिचाई यांना 6.52 लाख डॉलर्स (4.19 कोटी) मिळाले होते.
दिर्घकाळापासून कंपनीचे कर्मचारी म्हणून काम करणा-या सुंदर पिचाई यांची गूगलने 2015 मध्ये सीईओपदी नियुक्ती केली होती. 2016 मध्ये कंपनीला 198.7 मिलिअन डॉलर्स (जवळपास 12.77 अरब) किंमतीचे शेअर्स मिळाले आहेत जे 2015 च्या तुलनेत दुप्पट आहेत.
सीईओपदी झालेली बढती आणि अनेक नव्या प्रोडक्ट्सचं यशस्वीरित्या लाँचिंग केल्याचं पारितोषिक म्हणून त्यांना एवढी मोठी रक्कम देण्यात आली आहे. पिचाई यांच्या नेतृत्वात गूगलने आपल्या प्रमुख जाहिराती तसंच युट्यूब बिजनेसमध्ये चांगली प्रगती झाली आहे. यादरम्यान कंपनीने मशिन लर्निंग, हार्डवेअर आणि क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रातही गुंतवणूक केली आहे.