अबब ! नेत्याच्या अंत्ययात्रेत नाचवल्या पोल डान्सर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2017 01:43 PM2017-01-06T13:43:09+5:302017-01-09T14:43:23+5:30
तैवानमधील एका नेत्याच्या अंत्ययात्रेत 50 पोल डान्सर्सना बोलावण्यात आलं होतं
>ऑनलाइन लोकमत
तैवान, दि. 6 - एखाद्या नेत्याची अंत्ययात्रा म्हटलं की समोर दिसतात ते लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणारे समर्थक आणि कार्यकर्ते, शोकसागरात बुडालेले लोक. कोणी दुख: व्यक्त करत असतं, तर कोणी घोषणाबाजी करत आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देत असतो. पण तैवानमध्ये जेव्हा एका नेत्याची अंत्ययात्रा निघाली तेव्हा असं काहीही झालं नाही. पण जे काही झालं ते पाहून लोकांना नेमकं काय चालू आहे कळतंच नव्हतं. कारण या अंत्ययात्रेत चक्क पोल डान्सर्सना नाचवण्यात आलं.
म्हणजे एखाद्या अंत्ययात्रेत लोक वरातीमध्ये नाचतात तसे नाचत होते असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का ? नाही ना...पण असं खरोखर झालं. तैवानमधील एका नेत्याच्या अंत्ययात्रेत 50 पोल डान्सर्सना बोलावण्यात आलं होतं. या नेत्याचं नाव थांग होतं.
बिकनी घालून पोल डान्स करत निघालेली ही जगावेगळी अंत्ययात्रा पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.
थांग यांचं दिर्घ आजारामुळे डिसेंबरमध्ये निधन झालं होतं. 3 जानेवारीला ही अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
या पोल डान्सर्साठी वेगवेगळ्या रंगाच्या जीप आणण्यात आल्या होत्या. 'त्यांना मौज मस्ती करायला आवडायचं, यासाठीच आम्ही पोल डान्सर्सना बोलावलं होतं. जेणेकरुन त्यांना वेगळ्या प्रकारे अलविदा करता येईल', अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे.
थांग यांनीच आपल्याकडे ही इच्छा व्यक्त केल्याचं त्यांच्या भावाने सांगितलं.