अबब! त्यांनी नोकरांसाठी घेतला 265 कोटींचा बंगला
By admin | Published: July 12, 2017 11:54 AM2017-07-12T11:54:02+5:302017-07-12T12:27:35+5:30
वाचून तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खर आहे. कतारच्या शाही परिवाराने नोकरांसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये पाच मजली बंगला खरेदी केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 12 - वाचून तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खर आहे. कतारच्या शाही परिवाराने नोकरांसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये पाच मजली बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत अंदाजे 41 मिलियन डॉलर म्हणजेच 265 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या पाच मजली बंगल्यात त्यांचे विश्वासू नोकर राहणार आहेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार कतारच्या शाही परिवारनं हा बंगला रियल स्टेट मर्चेंट बँक आईलँड कॅपिटल ग्रुपचे संस्थापक अरबपती एंड्रयूफार्क्ससे यांच्याकडून खरेदी केला आहे. हा पाच मजली बंगला सर्व सोई सुविधायुक्त आहे. यामध्ये मोठ-मोठे डायनिंग हॉल, बार, क्लब, लाइब्रेरी, जिम, मसाज आणि प्लेरूम सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
आणखी वाचा - ढिंच्यॅक पूजाचे सर्व व्हिडीओ युट्यूबवरुन डिलीट
न्यूयॉर्क शहरामध्ये मॅनहट्टन येथे कतारच्या शाही परिवारानं हा बंगला घेतला आहे. शाही परिवाराची न्यूयॉर्कमधील ही तिसरी संपत्ती आहे. गेल्या वर्षी 2016 मध्ये 10,400 चौ. फूटमध्ये असलेल्या या बंगल्याची किंमत 275 कोटी रुपये होती. 2007 मध्ये एंड्रयू यांनी 150 कोटी रुपयांचा हा बंगला खरेदी केला होता. टुमबाज आणि अलिशान बंगल्याला खरेदी करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र कतारच्या शाही परिवारापुढे कोणाचाही निभाव लागला नाही, त्यांनी 265 कोटी रुपये मोजून हा बंगला खरेदी केला. कतारच्या शाही परिवारनं हा बंगला सरळ खरेदी केला यामध्ये कोणत्याही ब्रोकरनं हस्तक्षेप केला नाही. खरेदी केलेल्या या बंगल्याजवळील आणखी दोन घरेही त्यांचीच आहेत. 2002 मध्ये कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी 180 करोडमध्ये खरेदी केला होता.