अब्राहम बनला बाराव्या वर्षी पदवीधर

By admin | Published: May 24, 2016 04:41 AM2016-05-24T04:41:43+5:302016-05-24T04:41:43+5:30

अमेरिकेतील महाविद्यालयातून वयाच्या १२व्या वर्षी पदवी मिळविलेल्या तनिष्क अब्राहम या भारतीय - अमेरिकन मुलाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अभिनंदन केले आहे. अशी पदवी मिळविणारा

Abraham became the twelfth year graduate | अब्राहम बनला बाराव्या वर्षी पदवीधर

अब्राहम बनला बाराव्या वर्षी पदवीधर

Next

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील महाविद्यालयातून वयाच्या १२व्या वर्षी पदवी मिळविलेल्या तनिष्क अब्राहम या भारतीय - अमेरिकन मुलाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अभिनंदन केले आहे. अशी पदवी मिळविणारा तनिष्क हा अमेरिकेतील सगळ्यात कमी वयाचा विद्यार्थी ठरला असून, आता त्याला १८व्या वर्षी वैद्यकीय पदवी प्राप्त करायची आहे.
अब्राहमला लगेचच दोन प्रतिष्ठित विद्यापीठांनी स्वीकारले असून, कोणत्या विद्यापीठातून मेडिकल डीग्री मिळवायची याचा निर्णय अजून झालेला नाही.
तनिष्क कॅलिफोर्नियातील सॅक्रामँटोचा रहिवासी आहे. वैद्यकीय पदवी
मिळवेन तेव्हा मी १८ वर्षांचा असेन, असे तनिष्क म्हणाल्याचे सीबीसी सॅक्रामँटो टेलिव्हिजनने रविवारी म्हटले. त्याचे
वडील बिजोऊ अब्राहम हे सॉफ्टवेअर इंजिनीअर तर आई ताजी अब्राहम जनावरांची डॉक्टर आहे.

Web Title: Abraham became the twelfth year graduate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.