Nigeria Church Attack : रक्तरंजित रविवार! नायजेरियात प्रार्थनेदरम्यान चर्चमध्ये गोळीबार; लहान मुलांसह 50 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 09:46 AM2022-06-06T09:46:47+5:302022-06-06T09:57:19+5:30
Nigeria Church Attack : सामूहिक प्रार्थनेच्या वेळी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात तब्बल 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत.
नायजेरियामध्ये मोठा रक्तपात पाहायला मिळाला आहे. हल्लेखोरांनी रविवारी कॅथोलिक चर्चवर भीषण हल्ला झाला. सामूहिक प्रार्थनेच्या वेळी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात तब्बल 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा हल्ला नेमका कोणी केला आणि का केला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
ओंडो प्रदेशच्या सेंट फ्रान्सिस कॅथोलिक चर्चमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. रविवारा प्रार्थना करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. याच दरम्यान बंदूक घेऊन काही हल्लेखोर आत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. बंदुकधारी हल्लेखोरांनी चर्चच्या इमारतीच्या बाहेर आणि आतील लोकांवर गोळ्या झाडल्या, असे ओंडो राज्याचे पोलीस प्रवक्ते फनमिलायो इबुकुन ओदुनलामी यांनी सांगितले. रविवारी पेन्टेकोस्ट सण साजरा करण्यासाठी लोक चर्चमध्ये जमले होते. सर्वत्र आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते.
Gunmen with explosives stormed a Catholic church and opened fire in southwest Nigeria's Ondo state, killing "many" worshippers and wounding others, the government and police said https://t.co/uTGyoc0Oz8pic.twitter.com/9l0OdHMHE2
— AFP News Agency (@AFP) June 5, 2022
अचानक बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने चर्चचा परिसर हादरून गेला. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर जखमींना चर्चमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओंडोचे गव्हर्नर रोटिमी अकेरेडोलू यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. आम्हाला खूप दु:ख झालं आहे. आमच्या शांतीप्रिय लोकांवर शत्रूंनी हल्ला केल्याचं म्हटलं आहे.
अधिकाऱ्यांनी मृतांचा नेमका आकडा अद्याप जाहीर केलेला नाही. पण टिमिलीनने कमीत कमी 50 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा आकडा वाढू शकत असल्याचं देखील सांगितलं. हा हल्ला कोणी आणि का केला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात लोक पडलेले पाहायला मिळत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.