Accident: दर मिनिटाला दोन मृत्यू, कोरोनापेक्षा महाभयंकर, अपघातांबाबत भयावह आकडेवारी आली समोर
By नितीश गोवंडे | Published: June 28, 2023 08:34 AM2023-06-28T08:34:43+5:302023-06-28T08:38:44+5:30
Accident: रस्ते अपघातात होणारी जीवितहानी तसेच अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता रस्ता सुरक्षेचा विषय कोविडप्रमाणे गांभीर्याने घ्या, असे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या जागतिक रस्ता सुरक्षा परिषदेचे प्रमुख जीन टोड्ट यांनी केले.
स्टॉकहोम : रस्ते अपघातात होणारी जीवितहानी तसेच अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता रस्ता सुरक्षेचा विषय कोविडप्रमाणे गांभीर्याने घ्या, असे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या जागतिक रस्ता सुरक्षा परिषदेचे प्रमुख जीन टोड्ट यांनी केले. एवढेच नव्हे, तर रस्त्यांच्या दुरावस्थेकडे अपेक्षेप्रमाणे लक्ष दिले जात नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले...
जगभरात दरवर्षी अपघाती मृ्त्यू : १०.३ लाख
मिनिटाला : २+मृत्यू
१० पैकी नऊ मृत्यू अल्प व मध्य उत्पन्न देशांमधील
भारतात दरवर्षी होणारे अपघात ५ लाख
दरवर्षी होणारे अपघाती मृत्यू २ लाख
भारतातील प्रमुख कारणे
कारण संख्या प्रमाण
ओव्हर स्पीडिंग ८७,०५० ५५.९%
रॅश ड्रायव्हिंग ४२,८५३ २७.५%
खराब हवामान ५,४०५ ३.५%
ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह २,९३५ १.९%
वाहनातील बिघाड २०२२ १.३%
अन्य १५३५७ ९.९
सर्वाधिक अपघातांचे राज्ये
राज्य संख्या मृ्त्यू
तमिळनाडू ५५,६८२ १५,३८४
मध्यप्रदेश ४८,२१९ १२,४८०
कर्नाटक ३४,६४७ १०,०३८
उत्तर प्रदेश ३३,७११ २१,७९२
केरळ ३२,७५९ ३,४२९
महाराष्ट्र २६,५९८ १३,९११
स्त्रोत : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो-२०२१
कोविड संकटात संपूर्ण जग एकत्रितरीत्या लढले. तसेच सर्वांनी रस्ता सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर घ्यावा, असेही ते म्हणाले.