शिरच्छेद करणाऱ्या ‘त्या’ आरोपीची ओळख पटली
By admin | Published: September 27, 2014 06:51 AM2014-09-27T06:51:10+5:302014-09-27T06:51:10+5:30
इराकमधील इस्लामिक राज्याशी संबंधित व्यक्ती हातात चाकू घेऊन उभा असलेला दिसत असून, त्याची ओळख पटली आहे.
वॉशिंग्टन : इराकमधील इस्लामिक राज्याशी संबंधित व्यक्ती हातात चाकू घेऊन उभा असलेला दिसत असून, त्याची ओळख पटली आहे. तोच अमेरिकन नागरिकांचा मारेकरी असावा, असे अमेरिकन तपास संस्था एफबीआयचे संचालक जेम्स कोमी यांनी सांगितले; पण या आरोपीचे नाव व तो कोणत्या देशाचा रहिवासी आहे याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही.
अमेरिकन पत्रकार जेम्स फोले व स्टीव्हन सोटलॉफ यांच्या चेहऱ्यावर बुरखा घालून त्यांना उभे करण्यात आले होते व चाकूधारी माणूस त्यांच्याशी ब्रिटिश धर्तीने इंग्रजी बोलत होता अशी चित्रफ ीत आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध झाली होती. चित्रफितीतील चाकूधारी व्यक्ती ब्रिटिश धर्तीने इंग्रजी बोलत असून, तो लंडन येथील आशियाई नागरिक ांपैकी असावा असे युरोपीयन सूत्रांनी म्हटले होते. या आरोपीची ओळख पटविण्याचे काम अमेरिका व युरोपीय अधिकाऱ्यांनी केले. या आरोपीची ओळख पटली आहे; पण त्याचे नाव व देशाची माहिती आता मी देणार नाही, असे कोमे यांनी पत्रकारांना सांगितले. (वृत्तसंस्था)