अतिकर्ज हे देशासाठी धोकादायकच - नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:21 AM2018-06-05T00:21:33+5:302018-06-05T00:21:33+5:30

‘शांग्रिला संवादा’दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची अमेरिकी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी प्रशंसा केली आहे. कोणत्याही राष्ट्रासाठी अतिकर्ज धोकादायक आहे, असे मोदी यांनी म्हटले होते.

Acharyar is dangerous for the country - Narendra Modi | अतिकर्ज हे देशासाठी धोकादायकच - नरेंद्र मोदी

अतिकर्ज हे देशासाठी धोकादायकच - नरेंद्र मोदी

Next

वॉशिंग्टन : ‘शांग्रिला संवादा’दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची अमेरिकी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी प्रशंसा केली आहे. कोणत्याही राष्ट्रासाठी अतिकर्ज धोकादायक आहे, असे मोदी यांनी म्हटले होते. त्यावर मॅटिस यांनी म्हटले की, मोदी यांनी कर्जाच्या जोखमेबद्दल दिलेला इशारा योग्यच आहे.
सिंगापूर येथे झालेल्या १७ व्या आशियाई सुरक्षा शिखर परिषदेत मोदी यांनी शनिवारी हे भाषण केले होते. या शिखर परिषदेलाच ‘शांग्रिला संवाद’ असेही म्हटले जाते. या परिषदेच्या निमित्ताने मॅटिस यांनी मोदी यांची भेट घेतली होती. परिषदेहून परतताना मॅटिस सांगितले की, आवाक्याबाहेर कर्ज घेणे धोकादायक असल्याचा मुद्दा मोदी यांनी उपस्थित केला. चीनने श्रीलंका आणि पाकिस्तानला प्रचंड कर्ज दिले आहे. हे कर्ज आता या देशांसाठी ओझे बनले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे वक्तव्य केले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Acharyar is dangerous for the country - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.