खारीने केले ८२ हजार लीटर दुधाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 04:50 AM2017-08-14T04:50:36+5:302017-08-14T04:50:40+5:30
बर्नाबी : एका खारीमुळे ८ आॅगस्ट रोजी खवा बनविणाºया कारखान्यातील तब्बल ८२ हजार लीटर नासले. ८२ हजार लीटर वाहून गेले असते, तर कारखान्याला तसे काही फार वाईट वाटले नसते, पण दूध नासले, ते वीज पुरवठा बंद पडल्यामुळे, याचे वाईट वाटते.
एका हायड्रो खांबाला आग लागल्यानंतर स्कार्डिल्लो चीझ कारखान्यात सकाळी नऊनंतर लगेचच तातडीची सेवा देणाºया तुकडीला बोलावण्यात आले. ही आग लागली ती खारीने एक उपकरण कुरतडल्याने उडालेल्या ठिणग्यांनी.
या आगीमुळे बर्नाबीतील १५० रहिवाशांचा वीज पुरवठा बंद पडला पण सगळ््या जास्त हानी झाली ती चीझ फॅक्ट्रीची कारण त्यांचा मुख्य वीज पुरवठाच बाधीत झाला. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी १२ तास खर्च झाले व या दरम्यान ८२ हजार लिटर दूध नासले. हे दूध प्रचंड मोठ्या भांड्यात खवा बनवण्यासाठी ठेवले होते, असे कारख्यान्याच्या प्रशासक कॅथी स्कारडिल्लो म्हणाल्या.
सुदैवाने खव्याचे नुकसान झाले नाही कारण स्कार्डिल्लोने लगेचच जनरेटर्स भाड्याने आणून ते सयंत्र थंड ठेवले. जे दूध नासले त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व स्वच्छतेसाठी कारखान्याला आठवडा लागणार आहे. या सगळ््या नुकसानीला व गोंधळाला जबाबदार असलेली खार मात्र कोणालाही सापडलेली नाही.