नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 11:40 AM2024-11-19T11:40:49+5:302024-11-19T11:42:13+5:30

पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टारमर यांची भेट घेतली. विजय माल्ल्या आणि नीरव मोदींचा मुद्दा उपस्थित केला.

Action will be taken against Nirav Modi-Vijay Malla! PM Modi raised the issue before Britain | नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

PM Modi G20 Brazil : पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 परिषदेसाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी विजय मल्ल्या आणि नीरव मोदींसारख्या फरार आरोपींचा स्टारमर यांच्यासमोर मांडला. त्यामुळे अशा आरोपींवर कडक कारवाई अपेक्षा आहे. 

पीएम मोदी आणि ब्रिटिश पीएम स्टारमर यांच्यातील ही पहिली भेट होती. पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले, तर स्टारमर यांनीदेखील पंतप्रधानांना त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. भेटीदरम्यान, ब्रिटेन आणि भारतातील मायग्रेशन संबंधित प्रक्रियेला गती देण्यावर सहमती दर्शवली.

मोदी-माल्या फरार
भारतीय उद्योगपती नीरव मोदी हा मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणूक प्रकरणात फरार आहे. इंटरपोल आणि भारत सरकारने त्याच्यावर गुन्हेगारी कट, भ्रष्टाचार, मनी लाँड्रिंग, फसवणूक आणि घोटाळ्याचा आरोप केला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) 2 अब्ज डॉलर्सच्या फसवणुकीच्या प्रकरणात नीरव मोदी आरोपी आहे. तर, विजय मल्ल्या हादेखील एक भारतीय उद्योगपती आणि माजी खासदार राहिला आहे. किंगफिशर कंपनी बुडवल्याप्रकरणी माल्ल्यावर मनी लाँड्रिंग आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत. 

Web Title: Action will be taken against Nirav Modi-Vijay Malla! PM Modi raised the issue before Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.